मोहदी धरण बनविल्यास ड्राय झोन नरखेड भागा च्या शेती सिंचन व पाण्याचा प्रश्न सुटणार- जाधव

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या कमी खर्च धरणाने मध्यप्रदेश च्या गावातील पिण्याचा पाण्याची समस्या संपणार.

कन्हान : – नागपुर जिल्हयातील नरखेड तालुक्यातील ड्राय झोन परिसरातील मध्यप्रदेश सिमे जवळ महारा ष्ट्रातील मोहदी दळवी (हेटी) नाला येथे नविन धरण बवविण्याकरिता शेतक-यांच्या मागणीने रामटेक क्षेत्र शिवसेना माजी खासदार प्रकाश जाधव हया नी भेट देऊन सभोवतीच्या ग्रामस्थाच्या पिण्याच्या पाण्याची समस्या व नरखेड तालुक्यातील शेती सिंचना च्या दुष्टीने नैसर्गिक पाण्याचे पुर्नभरण होऊन जमिनी ची पाणी पातळी वाढविण्यास तसेच शेती सिंचनाकरि ता पाणी साठा उपलब्ध करण्यास नविन “मोहदी (दळवी) धरण” बनविल्या शिवाय शेतक-यांचा हा पाण्याचा संघर्षाचा लढा पुर्न ताकदीने लढणार अशी हमी शेतक-यांना दिली.
पंचायत समिती नरखेड माजी उपसभापती वैभव दळवी यांनी ग्रामस्थासह कित्येक वर्षापासुन नविन धरण बनविण्याकरिता संघर्ष करित असल्याने सोमवा र (दि.३१) मे ला रामटेक लोकसभा क्षेत्राचे शिवसेना माजी खासदार  प्रकाश जाधव यांनी मध्य प्रदेश सिमेलगत महाराष्ट्रातील नरखेड जवळ असलेले मोहदी (दळवी) येथे भेट देऊन नविन धरणा विषयी माजी उपसभापती वैभव दळवी व ग्रानस्थ शेतक-या कडुन माहिती घेत सविस्तर चर्चा केली. नरखेड भागा तील मोहदी दळवी (हेटी) नाला येथे नविन धरण बन विल्यास नागपुर जिल्हयाच्या नरखेड तालुक्यातील ड्राय झोनच्या ४० ते ५० गावांच्या शेतीला सिंचनाचा फायदा होईल. मोहदी दळवी, नरखेड, खरसोली, थुगा व (निपाणी), तिनखेडा, परसोडी (दीक्षित), पिंपळ गाव राऊत, दिदरगाव, नर्सिंगी, भारसिंगी आदी गावां चा व परिसरातील शेती सिंचनाचा प्रश्न मार्गी लागुन पुनश्च येथील बागायती शेती बहरू शकते. तसेच तालु क्यासाठी नविव मोहदी (दळवी) धरण ” लाईफ लाईन ” ठरून मध्य प्रदेशातील लांघा, खैरी, खापा, माळेगाव, पवार खेडा, खैरी पैका, सिवनी, पांढुर्णा या सभोवती च्या एक लक्ष लोकसंख्या परिसरातील गावांचा पिण्या च्या पाण्याचा प्रश्न सुटु शकतो. नविन धरणाला चारही बाजुने उंच पर्वत, डोगरानी वेढुन मोठया प्रमाणात मध ल्या खोलगट भागातील शेतजमिनी अधिग्रहण करून फक्त एकाच भागाला दोन टेकडया च्या मध्ये अंदाजे ७०० मीटर एकच धरण भिंत कमी खर्चात बवनवावी लागणार आहे. येथे नहराची (कॅनॉलची) गरज ही भासणार नाही. कारण उंच भागावर धरण होणार अस ल्यामुळे मोहदी दळवी ते नर्सिंगी वाहणारी मदार नदी हीच कॅनलचे काम करू शकणार आहे. जिल्हयातील एकेकाळी बागायती शेती वर सुखी नरखेड तालुक्या तील शेतकरी पाण्याची पातळी कमी झाल्यामुळ शेती डबघाईस आली. तरी सरकार व्दारे जमिनीतील पाणी पातळी वाढविण्याकरिता तसेच उंच भागातील मध्य प्रदेशातुन येणारे पावसाचे पाणी धरण बांधुन अडवुन साठवणुकीचे उपाययोजना करण्यात न आल्याने नर खेड तालुक्यातील शेतजमिनी दिवसेदिवस ड्राय झोन होत आहे. यामुळे येथील शेतीचे व शेतक-यांचे पुर्नजि वन करण्याचा एकमेव पर्याय नैसर्गिक पाण्याचासाठा फक्त हे नवीन मोहदी (दळवी) धरण होऊन नरखेड ला “लाईफ लाईन ” ठरू शकते. मध्य प्रदेशातील सभोव तीच्या गावांचा पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लागु शकते. जिल्हयातील ड्राय झोन नरखेड भागातील शेती व शेतक-यांचा सिंचन, पाण्याच्या संघर्ष लढयात माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव हे उतरल्याने नविन धरण बनण्याविषयी परिसरातील शेतक-याच्या आशा प्रफुलित होत शेती सिंचन व पाण्याचा संघर्ष लढा नव्या जोमाने लढुन हे धरण बनविल्या शिवाय थांबणा र नाही. याप्रसंगी माजी उपसभापती वैभव दळवी, मुन्नाौजी राय, संदीप बरडे, उत्तम कापसे, अजय बाल पांडे, हरिभाऊ दळवी, रमेश रेवतकर, मोतीराम रहाटे , रमेश मेंढे, शेषराव राऊत, विलास राऊत, विनायक वानखेडे, लीलाधर राऊत, ज्ञानेश्वर दळवी, रंजन ढोक णे, श्याम दळवी, राहुल जिचकार, जितेंद्र दळवी, जयंत जिचकार, मंगेश दळवी, जगदीश जिचकार, योगराज भारसकरे, भारत, वसंत दुधकवळे उपसरपंच सह परिसरातील शेतकरी बांधव बहु संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

150 च्या वर नागरिकांनी घेतला मोफत दंत तपासणी शिबिराचा लाभ

Wed Jun 1 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 1:- नागरिकांत दैनंदिन होणारी मुख रोगाची वाढ लक्षात घेता या मुख रोगावर उपचार करण्यासाठी न्यू स्माईल डेंटल क्लिनिक आणि इको लॉजिक फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने इस्माईलपुरा कामठी येथे आयोजित मोफत दंत तपासणी शिबिर तसेच मोफत औषधी वितरण शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या शिबिरात 150 च्या वर नागरीकानी उपचार घेतला. या शिबिरात न्यू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!