माझी वसुंधरामध्ये बेला ग्रामपंचायत राज्यात व्दितीय

– १.२५ कोटी मिळणार पुरस्कार

भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत राज्यस्तरावरील व्दितीय पुरस्कार ग्रामपंचायत बेला यांना जाहीर झाला. पुरस्कार रक्कम रुपये १.२५ कोटी आहे.

सन २०२३ – २४ या आर्थिक वर्षातील माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत बेला ग्रामपंचायतीने अभियानात भाग घेतला होता. अभियानातील सर्व निकषावर बेला पंचायतीने वर्ष भर कार्य त्याची फलश्रुती म्हणून बेला ग्रामपंचायतला १.२५ कोटीचे राज्यातुन व्दितीय पुरस्कार नुकताच शासनाने जाहीर केला.

त्यामुळे गावात सर्वत्र खुशीचे वातावरण आहे. त्याचे श्रेय सरपंच शारदा गायधने (शेंडे), उपसरपंच, अर्चना कांबळे, जि. प. सदस्य, यशवंत सोनकुसरे, प. स. सभापती, रत्नमाला चेटूले, गट विकास अधिकारी, डॉ. संघमित्रा कोल्हे, विस्तार अधिकारी, प्रमोद हुमणे, प्रमोद तिडके, ग्रामविकास अधिकारी विलास खोब्रागडे,तसेच ग्रा.पं.सदस्य रजनी बाभरे,मनिषा इंगळे, अर्चना पंचबुद्धे, सुप्रिया शेंडे, बबिता चवरे, वंदना कुथे, राकेश मते, विनोद नागपुरे, धनराज गाढवे, श्रीकृष्ण वैद्य, स्नेहल मेश्राम, सोपान आजबले, ग्रा. पं. कर्मचारी, पो. पा. श्रीराम भिवगडे, अध्यक्ष तं. मु. स. कन्हैया नागपुरे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, बचत गट कॅडर, नवजीवन ग्रामसंघ, गार्गी प्रभाग संघ, महिला बचत गट, व समस्त गावकरी बंधू आणि बघिनी यांना देण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ग्रामपंचायत येसंबा में शहीद भगतसिंग जयंती मनाई

Sun Sep 29 , 2024
कोदामेंढी :- दिनांक २8 सप्टेंबर शनिवार को मौदा पंचायत समिती अंतर्गत आने वाले ग्रामपंचायत कार्यालय येसंबा में शहीद भगतसिंग इनकी जयंती मनाई गई. उपसरपंच धनराज हारोडे इनके हस्ते क्रार्यक्रम की शुरूवात की गई. उपस्थित मान्यवारों ने उनके जीवन पर प्रकाश डाला. इस अवसर पर ग्रामपंचायत सदस्या करिश्मा पानतावणे, पोलिस पाटील नरेंद्र राऊत ,आशावर्कर सुषमा गजभिये , अरुणा बागडे, शकुंतला बागडे , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com