मी नागरिकांसाठी 24×7 उपलब्ध, म्हणून जनतेचा माझ्यावर प्रेम – विकास ठाकरे

– इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी भिडले ठाकरेंच्या प्रचारात

नागपूर :- नागरिकांना अडचण आल्यास त्यांना त्याच्या नेत्यापर्यंत पोहोचता आले पाहीजे. त्यांच्या समस्या ऐकून घेणारा प्रतिनीधी नागरिकांना हवा आहे. माझे चार दशकांपासून नागपूरच्या नागरिकांशी घट्ट नाते आहे. मी नागरिकांसाठी 24×7 उपलब्ध आहे. म्हणून जनतेचा माझ्यावर प्रेम असून जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने प्रेमाचा वर्षाव माझ्यावर होताना बघून आनंद होत असल्याचे प्रतिपादन इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे यांनी केले.

रविवारी सकाळी पश्चिम नागपुरात आयोजित जनआशीर्वाद यात्रेत ते बोलत होते. रविवारी सकाळी रेशीमबाग चौक येथील गुरुदेव नगर येथे नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. त्यानंतर जरीपटका येथील दयानंद पार्कमध्ये नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुरेश साखरे यांच्या निवास्थानी सचिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपण एकत्र पूर्ण ताकदीने लढू असा विश्वास व्यक्त केला. यानंतर सेंट विन्सेंट पलोटी चर्च येथे नागरिकांशी भेट घेऊन नागरिकांशी चर्चा केली. देशातील विविधतेतील एकता टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेस कटिबद्ध असून सर्व धर्मियांचा सन्मान करणारी आमची विचारधारा असल्याचे यावेळी नागरिकांना सांगितले. चर्च येथील चर्च परिसरातही नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या.

रविवारी पहिल्या सत्रातील रॅलीची सुरुवात पश्चिम नागपुरातून वंजारी माता मंदिर येथून झाली त्यानंतर भीनसेन चौक शिवमंदिर-चौरसिया चौक-पोस्ट ऑफिस शिवाजी डेकोरेशन-छोटा गड्डीगोदाम-कामठी चौक-धोबीपुरा-शितलामाता मंदिर-राजभवन भित-गवलीपुरा-जैन मंदिर-ईदगाह-गांधी चौक येथे सकाळच्य सत्राचे समारोप झाले. प्रामुख्याने माजी मंत्री अनिस अहमद, संजय किंगखेडे, देवेंद्र रोटेले, सरस्वती सलामे, मनीष कनोजिया, सपना घाटे, राजेश परतेकी, प्रकाश राव, किशोर जिचकार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह नागरिकही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवसेनेचे राजू पारवेंना सावनेरच्या विकासासाठी विजयी करा - चंद्रशेखर बावनकुळे

Mon Apr 8 , 2024
– महायुतीच्या कळमेश्वर, काटोल व नरखेड गावात नमो संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद नागपूर :- 54 वर्ष काँग्रेसची सत्ता असताना जे काम झाले नाही ते मोदी सरकारने केले. महाराष्ट्रात पंतप्रधान ग्राम रस्ते योजना व मुख्यमंत्री ग्राम रस्ते योजनेतून गावागावांत विकास कार्य झाले आहे. एक काळ राजीव गांधी पंतप्रधान असतांना ते ब्राम्हणी व कळमेश्वर तालुक्यासाठी जर 1 रुपया निधी देत होते. तो […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!