कन्हान :- शंकर नगर कांद्री येथील विशाल संतापे यांच्या घरी कुणी नसल्याच्या संधीचा फायदा घेऊन कुणीतरी अज्ञात चोराने घरफोडी करून नगदी रोख सह सोन्या, चांदीचे दागिने असे १,१९, ००० रू.चा मुद्देमाल चोरी करून पसार झाल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
माधुरी धनराज संताचे वय ३४ वर्ष व्यवसाय घरकाम रा. कोळसा खदान नं.३ ता. पारशिवनी जि नागपुर यांचे वडिलोपार्जित घर हे शंकर नगर प्रभाग क्र. ६ कांद्री – कन्हान येथे असुन दोन ब्लॉक चे घर आहे एका ब्लॉक मध्ये माधुरी तिची आई व मोठा भाऊ रॉकी राहतो तर दुस-या ब्लॉक मध्ये तिचा लहान भाऊ विशाल संतापे हा कुंटुबासह राहतो. तो (दि.२) फेब्रुवारी २०२५ ला सायंकाळी ७ वाजता लग्नाकरिता कुंटुबासह बांधा उत्तर प्रदेश ला गेला. माधुरी व तिची आई मागील ७ दिवसा पासुन मोठा भावाचे कोळसा खदान नं.३ येथील क्वाटर मध्ये राहत आहे. बुधवार (दि.५) ला रात्री ८ वाजता घरा शेजारी राहणा-या महिलेने फोन करून सांगितले की, तुम्हच्या भावाच्या घराचे दार उघडे दिसत आहे. लगेच आई सोबत शंकर नगर कांद्री येथील घरी पाहिले तर घराये दार उघडे असुन सामान अस्तव्यस्त पडलेले होते.
आत मध्ये आम्हच्या ब्लॉक मधिल दोन्ही लोंखडी आलमारी उघडया असुन त्यातील १) मंगळसुत्र सोन्याचे १० ग्रँम किमत ३५,००० रू. २) २ जोड सोन्याचे कानातले टॉप्स ०७ ग्रँम किंमत २५,००० रू. ३) एक सोन्याची ०४ ग्रँम नथ कीमत १५००० रू. आणि नगदी ५,००० रूपये असे ८०,००० रूपयाचा मुद्देमाल नव्हता तसेच लहान भाऊ विशाल संतापे च्या घरातील लोखंडी आलमारी तुटलेली असुन त्यातील १) एक सोन्याचे मंगळसुत्र कीमत १५,००० रू. २) दोन जोड सोन्याचे ०६ ग्रँम कानातील टॉप्स किमत २०,००० रू.६) चांदी च्या पायपट्या २ तोळे किमत ४,००० रू. एकुण ३९,००० रूपये असे एकुण १,१९,००० रूपयाचा रोख रक्कमेसह मुद्देमाल कुणीतरी अज्ञात चोराने घरफोडी करून चोरून पसार झाल्याने गुरूवार (दि.६) फेब्रुवा री ला फिर्यादी कु. माधुरी संतापे हिच्या तक्रारीवरून कन्हान पोस्टे चे पोहवा उमाशंकर पटेल हयानी पोलि स निरिक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन ला अप क्र. ७२/२०२५ कलम ३०५ (ए), ३३१(४), ३३३ बीएनएस अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.