नागपूर :-दिनांक १६.०४.२०२४ चे १४१५ वा. ते दिनांक १८.०४.२०२४ ये ०९.३० वा. ये दरम्यान, पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत, मुरी कॉलोनी, प्लॉट नं. १६, जरीपटका, नागपुर येथे राहणारे फिर्यादी नामे फिरदोस अकिल खान, वय ४५ वर्षे हे त्यांचे परात्ला कुलूप लावुन परीवारासह नातेवाईकाचे घरी ताजबाग येथे गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीचे घराचे मुख्य दाराने कडी कोडा तोडून, घराचे आत प्रवेश करून, परातील आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी १,८५,०००/-रु. असा एकुण ८,०१,०००/-रू. चा मुद्देमाल चोरून नेला. अशा फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पोलीस ठाणे जरीपटका येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नमुद गुन्ह्याचे समांतर तपासात, गुन्हे शाखेचे परफोडी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारामार्फतीने खात्रीशीर माहीतीवरून व तांत्रीक तपास करून, आरोपी नामे असलम अब्दुल उर्फ आशु वल्द शरीफ खान, वय २० वर्षे, रा. दारूल तक्वा मस्जीद मागे, यशोधरानगर, नागपुर यांस ताब्यात घेवुन, विचारपुस केली असता, त्याने नमुद गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच, त्यास अधिक सखोल विचारपुस केली असता, आजपासुन अंदाजे १५ ते १७ दिवसापुर्वी बेझनबाग येथेही घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यासंबंधाने पोलीस ठाणे जरीपटका येथे गुन्हा दाखल असल्याचे निष्षण्ण केले. आरोपीकडुन एकुण दॉन परफोडीचे गुन्हे उघडकीस आणुन, त्याचे ताव्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व नगदी ३,२००/-रु. असा एकुण ६,५७,१००/- रू. या मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालासह आरोपीस पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे जरीपटका यांचे ताब्यात देण्यात आले. नमुद कारवाई पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनात, परफोडी विरोधी पथकाचे पोनि किरण कयाडी, सपोनि मयुर चौरसिया, पोहवा राजेश देशमुख, रवि अहीर, प्रशांत गभणे, श्रीकांत उईके, पोना प्रविण रोडे, पोज सुधिर पवार यांनी केली.