नागपुर – आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनीयन (CITU) नागपूर जिल्हा येथे स्थापनेच्या अगोदर राज्यस्तरीय दूसरे अधिवेशन
8 व 9 ऑक्टोबर 2017 रोजी सातारा येथे पार पडले. संगठन नसतांना सुध्दा नवीन ओळख म्हणून प्रिती मेश्राम व पुष्पा पुट्टेवार या दोघी आशा वर्कर यांनी उपस्थित राहून महत्वाची भुमिका पार पाडली. 19 नोव्हेंबर 2017 रोजी नागपूर जिल्हा प्रथम अधिवेशन घेऊन जिल्हा कमेटी निर्माण केली. महासचिव प्रिती मेश्राम यांनी स्वतःची काळजी न करता संपुर्ण जिल्हा व विदर्भ स्तरावर संगठना बांधणी व वाढवणे हे प्रमुख कार्य केले. त्यामुळे विदर्भीत सिटू ची संगठना बळवट झाली. राज्य स्तरावर आशांचे प्रशिक्षण घेणे व मांगण्या मांडणे हे महत्वाचे काम त्यांनी केले. शहर सचिव म्हणुन रंजना पौनीकर यांची नेमणूक झाली असता शहर पातळीवर संगठना वाढीकरिता व सर्व आशा वर्कर मध्ये सामंजस्य राखण्या करता महत्वाची भुमिका पार पाडली.
त्याकरिता सर्व आशा वर्करांचे मोलाचे योगदान लाभले. 2007 पासुन 500 रू. मानधनावर काम करणाऱ्या आशा वर्करांना पहिली 1000 रू. वाढ 11 सप्टेंबर 2018 ला प्रथमता सिटूच्या संघर्षातून, केंद्राकडून मिळवून दिली. सप्टेंबर 2019 रोजी 15 दिवसाच्या राज्य स्तरीय संपानंतर जुलै 2020 पासुन आशांना 2000 रू. व गटप्रवर्तक यांना 3000 रू. वाढ मिळाली. जुन 2021 रोजी 9 दिवसाच्या संपानंतर जुलै 2021 पासुन आशानां 1500 रू. व गटप्रवर्तक यांना 1700रू. वाढ मिळवून दिली. त्या प्रमाणे कोरोना संकटाच्या महामारीत महत्वाची भुमिका पार पाडली. सोबत आपल्या हक्का करिता तिव्र आंदोलन करून आशाची क्षमता दाखवूण दिली. याची राज्य व केंद्रीय कमेटीने सुध्दा दखल घेतली नवीण प्रकारच्या विवीध कामाचा योग्य मोबदला मिळण्या करिता सिटूने महत्वाची भुमिका बजावून मोबदला मिळवून दिला या पुढे सुध्दा आशा व गटप्रवर्तकांची महत्वाची भुमिका राहिल.

अध्यक्ष कॉ.राजेंद्र साठे