– रन फॉर डिस्टिंक्शन मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
– युवक-युवती,नागरिक, शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचा लक्षणीय सहभाग
नागपूर :- नागपूर महानगरपालिका,जिल्हा प्रशासन आणि स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता ‘रन फॉर डिस्टिंक्शन’ मॅरेथॉन स्पर्धेचे सोमवारी (ता.१५) आयोजन करण्यात आले, कस्तुरचंद पार्क येथे आयोजित स्पर्धेत सक्रीय सहभाग नोंदवीत नागपूरकरांनी रन फॉर डिस्टिंक्शन मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.
१० किलोमीटर, 5 किलोमीटर, आणि २ किलोमीटर फन रन मॅरेथॉनला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली. याप्रसंगी जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्याशर्मा, उपायुक्त अर्चित चांडक, गोरखनाथ भामरे, हरवीर, रेल्वे अधिकारी काशिनाथ पाटील मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मिलिंद मेश्राम, प्रकाश वराडे, सहायक आयुक्त सर्वश्री. महेश धामेचा, हरीश राऊत, गणेश राठोड, नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे, क्षय रोग अधिकारी शिल्पा जिचकार, पोलीस, मनपा क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबोलकर, पल्लवी धात्रक, सुकेशनी तेलगोटे, मनपाचे उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे, एन डी एसचे जवान अग्निशामन व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान, स्वीपचे आयकॉन गुरुदास राऊत, जयंत दुबळे यांच्यासह इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
स्पर्धेत मतदार विद्यार्थी, नागरिकयांच्यासह शासकीय व खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ज्येष्ठधावपटूंचाही सहभाग मिळाला. १० किलोमीटर आणि 5 किलोमीटर मॅरेथॉनला ऐतिहासिक सीताबर्डी किल्ल्याच्या प्रवेशद्वारापासून सुरुवात झाली, तर २ किलोमीटर फन रन स्पर्धेला कस्तुरचंद पार्क येथून सुरुवात करण्यात आली, यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्वतः मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत धावपटूंचा उत्साह वाढविला. अग्निशामन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या जवानाने धावपटूंच्या सुरक्षेसह वाहतूक मार्गनियोजन पाहिले तर आरोग्य विभगाकडून आवश्यक मदत देण्यात आली. स्पर्धेच्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व परितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमात डॉ. पद्माकर चारमोडे यांनी विजेत्यांच्या नावाची घोषणा केली, आर जे अमोद आणि श्री. मनीष सोनी यांनी आपल्या सूत्रसंचालनाने वातावरण प्रफुल्लित केले. तर स्वरूप भट या ६ वर्षीय चिमुकल्या स्पर्धकांने केलेल्या वोर्मअप एक्सरसाईजने उपस्थितांमध्ये नवीन उत्साह संचारला. तसेच आम्ही मतदान नक्की करू आणि इतरांना देखील मतदानासाठी प्रेरित करू अशी ग्वाही उपस्थितांनी दिली.
स्पर्धेचे विजेते खालीलप्रमाणे
– 10 किमी महिला गटात: रिया धोत्रे-प्रथम, मिताली भोयर- द्वितीय, चैताली बोरकर- तृतीय, रिता तरारे-चतुर्थ तर रेणू सिद्धू- पाचवा-
-10 किमी पुरुष गटात: सौरभ तिवारी -प्रथम, राजन यादव- द्वितीय, रोहितपटले-तृतीय, सनी फुसाडे -चतुर्थ, ओम आत्राम-पाचवा.
– 5 किमी महिला गटात: भाग्यश्री मोहले- प्रथम, त्रीप्ती पाटील- द्वितीय, तन्मयपिंपळकर- तृतीय, स्नेहा जोशी-चतुर्थ, अंजली मडावी-पाचवा
-5किमी पुरुष गटात: भावेश खंडार -प्रथम, गौरवखोदातकर – द्वितीय, कुणाल वाघ-तृतीय, प्रणय माहुरले- चतुर्थ, नागेशकाटखाये- पाचवा.
फन रन २ किमी –
सर्वात तरुण धावक : आर्या टाकोणे, वय ६ वर्ष
वरिष्ठ धावक : डोमा चाफाले, वय ७६ वर्ष
कुटुंब : कुणाल परवे आणि कुटुंब