‘मेरी माटी मेरा देश’ अभियानात योगदान देणाऱ्या मान्यवरांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

– भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे- राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- देशाच्या विकासासाठी प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींचे योगदान महत्वपूर्ण आहे. प्रत्येक भारतीय नागरिकांना आपला देश विश्वगुरू व्हावा, असेच वाटते त्यासाठी आपापल्या क्षेत्रात देशाच्या विकासाचे लक्ष्य समोर ठेऊन कार्य केले तर नक्कीच आपला भारत देश विश्वगुरु होईल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेच्या वतीने ‘मेरी मोटी मेरा देश’ या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांचा प्रातिनिधिक स्वरूपात मातृभूमी स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी प्रधानमंत्री आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे राष्ट्रीय महिला अध्यक्ष अर्पिता राय, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष राजकुमार पाल आणि अभियानात सहभागी असलेले काही प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी राज्यपाल म्हणाले, देशासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानामुळे स्वातंत्र्याचे अमृतक्षण आपण अनुभवतो आहोत. ’माझी माती माझा देश’ अभियानातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत आपण हा ऐतिहासीक वारसा जोपासण्याचे काम केले.

या अभियानात महाराष्ट्राने दिलेल्या बहुमोल योगदानाची गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झाली यांचा अभिमान आहे. असे राज्यपाल यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप आपण ‘माझी माती माझा देश’ या राष्ट्रभक्तीने प्रेरित उपक्रमातून स्वातंत्र्यसैनिकांना, शहिदांना नमन आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करुन साजरा केला. प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी सन 2047 पर्यत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचा निर्धार केला आहे त्यांचे स्वप्नं आपल्या सर्वांच्या सहकार्यातून पूर्ण करु असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनसे के अनिल नेहारे मेटपांजरा के सरपंच

Sat Dec 30 , 2023
– सुरेश खंडाते निर्विरोध उपसरपंच  काटोल :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना के काटोल तालुका अध्यक्ष अनिल नेहारे 05 नवंबर को सार्वजनिक चुनाव में काटोल पंचायत समिति के मेटपांजरा ग्राम पंचायत के सरपंच चुने गए थे। 28 दिसंबर को उन्होंने सरपंच पद का पदभार संभाला. 28दिसंबर को उपसरपंच पद के लिए हुए चुनाव में सुरेश खंडाते को निर्विरोध उपसरपंच चुना गया. इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com