-सावनेर येथे 67 तर कळमेश्वर 93 लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वितरण
नागपूर : गरीब व बेघर गरजू कुटुंबांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील 160 बेघरांना हक्काचे घर मिळावेत, यासाठी आज पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार याच्या हस्ते भूखंड प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
‘सर्वांसाठी घरे’ महाआवास अभियान 2022 अंतर्गत सावनेर पंचायत समिती येथे तालुक्यातील 67 बेघर लाभार्थ्यांना व कळमेश्वर येथे 93 लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले,
जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुमित्रा कुंभारे, पंचायत समितीच्या सभापती अरुणा शिंदे, उपसभापती प्रकाश पराते, पंचायत समिती कळमेश्वर सभापती दादा भिंगारे, उपविभागीय अधिकारी अतूल म्हेत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, सचिन यादव ,गटविकास अधिकारी दिपक गरुड, महेश्वर डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबा कोढे , सावनेर बाजार समितीचे सभापती बंडू चौधरी, जि.प. सदस्य महेंद्र डोंगरे, खरेदी-विक्री सोसायटीचे दिलीप बनसिने, प्रकाश खापरे यावेळी उपस्थित होते.
गावात ज्यांना घरकुल नाही अशांनी तात्काळ मागणी करावी, त्यांच्यापर्यंत शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल. गरीबांच्या समस्या सुटत नाही याची खंत वाटते, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रशासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल. शासन निर्णयानुसार लोकांना भूखंड उपलबध करुन देऊ, असे श्री. केदार यांनी सांगितले.
सावनेर मतदार संघातील 3512 भूखंड प्रकरण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने निकाली काढण्यात येईल. पंचायत समितीने बैठक घेऊन त्याबाबत आढावा घेण्याचे त्यांनी सांगितले. त्यासोबतच गरीबांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, राशनकार्ड तसेच घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले. या कामास सरपंच व उपसरपंचानी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.
नागपूर जिल्हयातील मतदार यादीचे पुनरीक्षण कार्यक्रमात सावनेर तालुका पहिल्या क्रमांकावर आहे.
त्याचप्रमाणे इतरही कामास गती देण्याचे त्यांनी सांगितले. पानंद रस्त्याचा आराखडा तयार करा त्यास शासनाकडे पाठपूरावा करण्यात येईल, असे ते म्हणाले. गारपिट व पाऊसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाईची मदत लवकरच देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी सावनेर तालुक्यात 67 व कळमेश्वर तालुक्यात 93 बेघर लाभार्थ्यांना भूखंड मंजूरी प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी दिपक गरुड यांनी केले तर उपस्थितांचे आभार पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जोगेवार यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, तालुक्यातील बेघर लाभार्थी, सरपंच व उपसरपंच मोठया संख्येने उपस्थित होते.
-दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com