जिल्ह्यात हिवताप सामुदायीक सर्व्हेक्षण मोहीमेची सुरुवात

गडचिरोली :- गडचिरोली जिल्हा हा अतिर्दुगम, डोंगराळ व जंगलाने व्याप्त असल्याने हिवतापासाठी संवेदनशील आहे. एटापल्ली, भामरागड, धानोरा, कोरची, अहेरी, हे तालुके अतिशय दुर्गम कार्यक्षेत्र असून नदी, नाले, डोंगरदऱ्यांनी व पहाडांनी व्यापलेले आहे. गडचिरोली जिल्हयालगत छत्तीसगढ, तेलंगाना हे राज्य व भंडारा, गोंदीया व चंद्रपूर या जिल्हयाची सिमा लागून आहे.

गडचिरोली जिल्हयातील आदिवासी व दुर्गम भागातील नागरिक हे जंगलात असलेल्या छोट्या-छोट्या गावामध्ये राहतात. मान्सून कालावधीत 30 टक्के व त्यापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे हिवतापाबाबत विचार केले असता, संपूर्ण महाराष्ट्रातील पी.एफ मलेरीया 60 ते 67 टक्के रुग्ण हे फक्त गडचिरोली जिल्हयातील असतात. जिल्हयाची भौगोलीक परिस्थीती अतिविशेष असल्यामुळे हिवताप निर्मुलन करण्याकरीता विशेष उपाययोजनांची आवश्यकता आहे. या करीता शासनाने सन 2022-23 या आर्थीक वर्षाच्या पी.आय.पी. मध्ये गडचिरोली जिल्ह्यात हिवतापाचे सक्रीय संक्रमण होत असल्यामुळे, हिवतापाचा समुळ नायनाट करण्यासाठी व अतिदुर्गम भागातील अतिजोखमीच्या समुदायासाठी विशेष विरोधी उपाययोजना राबविण्यासाठी व हिवताप बाधीत रुग्णाचे पूर्ण संक्रमण रोखणेसाठी हिवताप सामुदायीक सर्वेक्षण शोध मोहीम राबवून समस्याग्रस्त भागाचा शोध घेऊन तेथील सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण माहे 15 जून 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत घेण्याचे मागदर्शक सुचना दिलेल्या आहेत. विशेष हिवताप सर्वेक्षण मोहीम ही संपर्क तुटनारी गावे, डोंगराळ भागातील गावे, हिवताप प्रार्दुभाव असलेल्या गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी 6 तालुके, 16 प्रा.आ.केन्द्र, 122 उपकेन्द्र व 694 गावाची निवड करण्यात आली असून 122 आरोग्य उपकेंद्रातील सामुदायीक आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक (महिला व पुरुष), हंगामी क्षेत्र कर्मचारी, आशा वर्कर यांचे मार्फत सर्वेक्षणाचे काम करण्यात येणार आहे. या मोहीमेत 257296 लोकांचे आर.डी.के. व्दारा तपासणी करण्यात येईल. आर.डी.के.दुषित आढळून आलेल्या रुग्णांचे रक्त नमुने घेवून तपासणी करण्यात येईल. तसेच हिवताप दुषीत रुग्णांना प्रा.आ.केन्द्रातील आरोग्य यंत्रणेमार्फत उपचार करण्यात येईल. सदर शोध मोहिमेत निवड केलेल्या गावात ग्रामपंचायतमार्फत मुनादी देवून टिमव्दारे प्रत्येक घरी भेट देण्यात येईल. यामध्ये किटकशास्त्रीय सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, दुषित कंटेनरमध्ये औषधी टाकणे, डासोपत्ती स्थानात गप्पी मासे सोडणे यापध्दतीने हि मोहिम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाचे वतीने दिनांक 15 जून 2023 ते 30 जून 2023 या कालावधीत हिवताप शोध मोहीम यशस्वी करण्यासाठी डॉ. श्याम निमगडे सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. कुणाल मोडक यांनी जनतेला व कर्मचाऱ्यांना आवाहन केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुणांची कोट्यावधी रुपयाने फसवणूक

Wed Jun 21 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – गुंतवणुकीची झाली घाई, तरुणांची हडप झाली कमाई कामठी :- एका चिटफंड कंपनीकडून कामठी शहरातील बहुतांश तरुण गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची चर्चा शहरात रंगत आहे . कष्ट करून आणि घाम गाळून कमावलेले पैसे असेच कुणाकडे सोपवताना काळजी घेणे आवश्यक आहे. अल्पावधित पैसे वाढवून देण्याचे आमिष आपली कष्टाची कमाई बुडीत घालवु शकते.चांगला परतावा, आकर्षक व्याज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com