संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 8 :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरानी या पृथ्वीवर शांती ,समता ,करुणेचे राज्य राहावे यासाठी अहोरात्र संघर्ष केले त्यांचा त्याग हा जगाला ऊर्जा निर्माण करणारा आहे तर परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शोषित ,वंचितांचे मुक्तीदाते असल्याचे मौलिक प्रतिपादन कामठी चे माजी नगराध्यक्ष नीरज यादव यांनी प्रभाग क्र 15 येथील आनंद नगर येथे 6 डिसेंबर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम निमित्त आयोजित मानवंदना कार्यक्रमात व्यक्त केले.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नीरज यादव यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करून विशेष बुद्ध वंदना घेऊन मानवंदना वाहण्यात आली.याप्रसंगी आशा खोब्रागडे, अनिता गजभिये,अनिता उके,ज्योती मेश्राम,विद्या बोंबले,जया मेश्राम,अर्पण सिंगाडे,लक्ष्मी सिंग,पुष्पां तिरपुडे, जया चंद्रिकापुरे,सुजाता मेश्राम,छाया खोब्रागडे, छाया रामटेके,पंकज गजभिये,पांडुरंग रामटेके, अल्पेश भोवते,बालकदास सिंगाडे,भारत खोब्रागडे, प्रफुल उके, कैलास मेश्राम,अनिकेत चाटे,कुणाल सोलंकी आदी उपस्थित होते