नागपूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे दोन दिवस नागपूर जिल्हा दौ-यावर येत आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते नागपूर विद्यापीठातील दीक्षांत समारंभासह विविध शैक्षणिक संस्थांना भेटी देणार आहेत.
मंत्री सामंत यांचे आज मंगळवारी (24 मे) सकाळी सव्वासात वाजता नागपूर येथे आगमन होईल. त्यानंतर सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या नागपूर येथील उपकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमास तर सकाळी 11 वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथील पदविका वितरण समारंभास उपस्थित राहतील.
दुपारी साडेबारा वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली आणि कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक याबाबत आढावा बैठक घेणार आहेत. सामंत दुपारी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रास भेट देणार असून साडेतीन वाजता शासकीय तंत्रनिकेतन येथील ॲटोमोबाईल इंजिनियरींग डिपार्टमेंटच्या प्रोडक्ट डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करतील. त्यानंतर शासकीय अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतनचा आढावा घेणार आहेत. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला सायंकाळी 5 वाजता भेट देणार आहेत. त्यानंतर स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री रविभवन येथे मुक्काम करतील.
बुधवारी (दि.25मे) सकाळी 10 वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या 109 व्या वार्षिक दीक्षांत समारंभास उपस्थित राहून अमरावतीकडे प्रयाण करतील. अमरावती येथील स्थानिक कार्यक्रमास उपस्थित राहून दुपारी साडेचार वाजता नागपूर येथे त्यांचे आगमन होईल. सायंकाळी साडेसात वाजता ते नागपूर येथून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील