उच्च न्यायालयात एसबीसी घटकाची बाजू भक्कमपणे मांडू :- इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार

विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाबाबत बैठक

 मुंबईदि. 15 :  राज्यात विशेष मागास प्रवर्गाचे  दोन टक्के आरक्षण संरक्षित करण्यासाठी शासन  भक्कमपणे उच्च न्यायालयात एसबीसी घटकांची बाजू मांडेल त्यासाठी विशेष अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्रालयातील दालनात विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाबाबतच्या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर मुख्य सचिव नंदकुमार,सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगेएसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे सरचिटणीस सुरेश पदमशाली  इतर सदस्य सुदर्शन योगा,राजू गाजंगी उपस्थित होते.

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले,युथ फॉर इक्वॅलिटी या संघटनेने एसबीसी आरक्षण रद्द करण्याची  याचिका मुंबई मा.उच्च न्यायालयात दाखल केली आहे.याबाबत राज्यात विशेष मागास प्रवर्गाचे दोन टक्के आरक्षण  ५० टक्के मध्ये बसवून संरक्षण द्यावे अशी मागणी विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीने केली आहे. या मागणीबाबत शासन सकारात्मक आहे. उच्च न्यायालयात एसबीसी घटकांची बाजू मांडण्यासाठी  शासन विशेष अभियोक्ता नियुक्त करेल, असे श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

फर्दापूर येथील शिवस्मारक आणि भीमपार्कचे काम तात्काळ सुरु करावे - महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार  

Tue Feb 15 , 2022
 मुंबई, दि. 15  : औरंगाबाद जिल्ह्यातील फर्दापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्धतेसह सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण करुन बांधकामास प्रत्यक्षात सुरूवात करण्यात यावी, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.             मंत्रालयात शिवस्मारक व भीम पार्क उभारण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गटने, पर्यटन उपसंचालक, औरंगाबादचे जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!