नागपूर :- काँग्रेसमध्ये मागील अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या फुटाळा निवासी हेमा कंगाली या तरुणीने काँग्रेस सोडून बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला. बसपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी ऍड. सुनील डोंगरे ह्यांनी त्यांना पक्षात प्रवेश देऊन पश्चिम नागपूर बसपाच्या उपाध्यक्षपदी निवड केली.
याप्रसंगी प्रदेश बसपाचे सचिव नागोराव जयकर, पृथ्वीराज शेंडे, नितीन शिंगाडे, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, जिल्हा अध्यक्ष संदीप मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग, पश्चिम विधानसभा अध्यक्ष सनी मून प्रामुख्याने उपस्थित होते.