संदीप बलवीर,प्रतिनिधी
– कर्मयोगी फाउंडेशन चे अध्यक्ष पंकज ठाकरे यांचे जनतेला आव्हाण
– अपघातग्रस्त देवळे परिवाराला कर्मयोगीची १० हजाराची आर्थिक मदत
नागपूर :- राजू महावीर देवळे (४३) वर्ष, रा असोला (सावंगी) यांचा ऑगस्ट महिन्यात पचमढी वरून दुचाकीने घरी परत येत असतांना रस्ता अपघात झाला. त्यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचाराकरिता आर्थिक चणचण भासत आहे. त्यामुळे ज्याप्रकारे लोक गावागावत धार्मिक, सांस्कृतिक कार्यासाठी वर्गणी जमा करून हे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करतात.त्याचप्रमाणे जर गणेश मंडळाच्या वर्गणीत थोडी काटकसर करून आपण राजू देवळे यांना आर्थिक मदत केल्यास ते लवकरच आपल्या पायावर उभे होऊन आपल्या परिवाराचे पाठीराखे होतील.म्हणून राजू देवळे यांच्या उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत करण्याचे आव्हाण कर्मयोगी फाउंडेशण चे अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी जनतेला केले असून याची विधिवत सुरुवात त्यांनी स्वतःच्या कर्मयोगी फाउंडेशन मधून देवळे परिवाराला १० हजाराचा धनादेश देत केली.
आठ दिवसा अगोदर आसोला सावंगी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथील पूजा देवळे यांनी कर्मयोगी फाऊंडेशनला फोन केला आणि सांगितले की, माझ्या पतीचा अपघात झाला आहे. एक शस्त्रक्रिया झाली दुसरी करायची आहे, दर सोमवारला शुअरटेक हॉस्पिटल येथे न्यावे लागते, परिस्थिती अतिशय हालाकीची आहे तुम्ही आम्हाला रुग्णवाहिका उपलब्ध करून द्या व काही आर्थिक मदत कराल का? तेव्हा कर्मयोगीचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी सांगितले की आमच्याकडे रुग्णवाहिका नाही, मी दुसरीकडून प्रयत्न करतो व लवकरच तुमच्या घरी येऊन यथाशक्ती मदत करू.
तेव्हा आपल्या दिलेल्या शब्दाला पाळत गणेश स्थापनेच्या दिवशी अपघातग्रस्त व्यक्ती राजु महावीर देवळे यांची कर्मयोगी फाऊंडेशन कडून भेट घेत परिस्थिती जाणून घेण्यात आली.
राजू देवळे यांचा ऑगस्ट महिन्यात पचमढी वरून येताना अपघात होऊन उजव्या पायाला जबर दुखापत झाली. चारचाकी गाडीवाला त्यांच्या दुचाकी गाडीला उडवून पसार झाला. तेव्हा त्यांच्या सोबत असणाऱ्या काही सहकाऱ्यांनी त्यांना हुसंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. परंतु त्यांनी त्यांचा इलाज न करता आपल्या महाराष्ट्रात घेऊन जा असा सल्ला दिला.शेवटी त्यांना नागपूर येथील शुअरटेक हॉस्पिटलमध्ये आणून तुटलेल्या पायाची शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून करण्यात आली. या सर्व परिस्थितीला घरात आठरविश्व दारिद्र्य असताना त्यांची पत्नी पूजा देवळे या मोठ्या हिमतीने तोंड देत होत्या, अशातच त्यांना सागण्यात आले की,पायाची कटोरी सरकली आहे, ती गुजरात वरून बोलावून दुसरी शस्त्रक्रिया केली तरच ते पायावर उभे राहू शकणार. अशा परिस्थितीत त्यांचे सर्व मित्र व आप्तजन जवळ यायला सुद्धा तयार नाही.त्यात परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दररोज औषधोपचाराचा खूप खर्च येत आहे,राहायला स्वतःचे घर पण नाही. होते ते रस्त्याच्या रुंदीकरणात गेले व त्यातून मिडलेल्या ३ लाख रुपयातून छोटासा प्लॉट घेतला व त्या आता भाड्याने राहतात. त्यात दवाखान्यात कमीत कमी स्वतःचा एक लाख रू खर्च होऊन गेला आहे. आता त्यांच्याकडे रोजच्या औषधपाण्याला पण पैसे नाही. पूजा ह्या २०० रुपये रोजाने शेतमजुरीला जातात, कधी काम असतं कधी काम नसतं, दोन छोटी मुलं त्यांच्या शिक्षणाचा खर्च. अश्या स्थितीत पुजा यांच्या समोर संकटाचा पहाड उभा झाला आहे. याही परिस्थितीत त्यांनी दुसऱ्या शस्त्रक्रिये करीता पैसे जमा करण्यासाठी त्या जीवाचं रान करत आहे ही सर्व परिस्थिती जाणून कर्मयोगी फाऊंडेशन तर्फे माणुसकी जपत १० हजार रुपयांचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.परंतु कर्मयोगीने केलेली मदत ही फार तोकडी असून उपचाराकरिता भरपूर पैसा हवा आहे. त्यामुळे एका गरीब परिवाराला या संकटाच्या क्षणी आर्थिक मदत करून या गणेशोत्सवात आपणही विघ्न विनाशक बना व राजू देवळे यांच्या उपचाराकरिता या अकाउंट नंबर 29413211008439
Ifsc UCBA0002941वरती मदत पाठवून कृतार्थ व्हा. यावेळी कर्मयोगी परिवारातील बरीच मंडळी उपस्थित होती.