शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर, मनपा प्रशासनाने तातडीने राबविली आपत्ती व्यवस्थापन मोहीम

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात काल दि.२२ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाचे आगमन झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सदर घटनेची माहिती मनपा प्रशासनास कळताच तातडीने कोसळलेली झाडे हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून अधिकांश परिसर रहदारीस मोकळा करण्यात आला आहे.काल वादळात शहरातील तुकूम, बंगाली कॅम्प,रयतवारी कॉलोनी, हवेली गार्डन छत्रपती नगर,वडगाव,सरकार नगर इत्यादी परिसरात झाडे पडण्याच्या घटना घडल्या.सुदैवाने यात जीवित हानी अथवा कुणी जखमी होण्याची घटना घडली नाही. अनेक जागी झाडे पडल्याने रहदारीस अडथळा होईल हे लक्षात घेता मनपा अग्निशमन विभाग,उद्यान विभाग व स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांद्वारे सदर झाडे हटविण्याची मोहीम रात्रीच हाती घेण्यात आली.शहराच्या विविध भागातील १५ ते १६ कोसळलेली झाडे हटवुन रात्रीच रस्ता मोकळा करण्यात आला तर उर्वरीत ठिकाणची झाडे हटविण्याचे काम सुरु आहे. काल आलेल्या वादळात वाहणारे वारे हे अत्याधिक गतीने वाहत होते तसेच पावसाचाही जोर अधिक असल्याने अनेक ठिकाणी नागरीकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुंबई उपनगर जिल्हा माध्यम कक्षास माध्यम प्रतिनिधींनी दिली भेट

Tue Apr 23 , 2024
मुंबई उपनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे (पूर्व), मुंबई येथे कार्यान्वित करण्यात आलेल्या माध्यम कक्ष आणि माध्यम प्रमाणन व सनियंत्रण कक्षास विविध माध्यमांच्या प्रतिनिधींनी भेट देवून पाहणी केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी तेजस समेळ यांच्या सहकार्याने माध्यम कक्ष तथा माध्यम प्रमाणन व सनियंत्रण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!