शहरात तीव्र उष्णतेची लाट (Heat Wave) आयुक्तांद्वारे उष्माघात कृती आराखड्याचा आढावा

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात उष्णतेची लाट सुरु असुन तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार झाले आहे व सातत्याने वाढत आहे. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कृती आराखड्याचा आढावा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्याद्वारे घेण्यात आला.

उष्माघाताचा विशेष धोका हा ५ वर्षापेक्षा कमी असलेल्या लहान मुलांना व ६५ वर्षावरील असलेल्या नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर,प्राणी,अल्कोहोल, धूम्रपान करणारे,शुगर,डायबिटिजचे रुग्ण यांना विशेषतः असतो. अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी,अतिसार,भारी घाम येणे, मळमळणे,फिकट त्वचा,हृदयाचे ठोके जलद होतात,पोटाच्या वेदना ही उष्माघाताची लक्षणे आहेत.

उष्माघातापासुन संरक्षणासाठी भरपूर पाणी प्यावे, थंड पेये – ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. विना चप्पल बाहेर जाऊ नये,लहान मुलांना तसेच प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये. थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.

याप्रसंगी आरोग्य विभागास अत्यावश्यक प्रसंगी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच उष्माघातापासुन संरक्षण कसे करावे याची माहीती विविध माध्यमांद्वारे कधीकधी नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे,डॉ. शरयु गावंडे,डॉ.आरवा लाहिरी,डॉ. नरेंद्र जनबंधू डॉ. अतुल चटकी उपस्थीत होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चांदा सिटी हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातुन १६४३ तक्रारींचे निवारण, मनपाच्या तक्रार निवारण कार्यप्रणालीस उत्तम प्रतिसाद

Tue May 16 , 2023
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरु करण्यात आलेल्या चांदा सिटी हेल्पलाईन ॲप नामक तक्रार निवारण कार्यप्रणालीस चांगला प्रतिसाद मिळत असुन सदर ॲपवर आतापर्यंत विविध विषयांच्या १७४३ तक्रारी प्राप्त झाल्या असुन यापैकी १६४३ तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी पालिकेची सुत्रे हाती घेतल्यापासुन मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा लोकभिमुख होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. यापुर्वी नागरीकांच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com