महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(नागपूर मेट्रो रेल प्रकल्प)
नागपूर :- हरियाणा राज्याचे पर्यावरण,वन आणि वन्यजीव मंत्री राव नरबीर सिंह यांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट देत नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाची पाहणी केली ज्यामध्ये त्यांनी मुख्यतः तांत्रिक दृष्टया अतिशय कठीण आणि आव्हानात्मक समजले जाणारा एलआयसी चौक ते ऑटोमोटिव्ह चौक ५.६७ किमी लांबीचा डबल डेकर उड्डाणपूलाची त्यांनी पाहणी केली यावेळी महा मेट्रोचे अधिकारी व हरियाणा राज्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पाहणी दरम्यान सिंह यांनी सदर प्रकल्प कश्या प्रकारे तयार करण्यात आला, कुठल्या प्रकारच्या अडचणींचा सामना यावेळी कराव्या लागल्या आदी बाबींचा आढावा त्यांनी महा मेट्रोच्या अधिकाऱ्याकडून समजून घेतला.
आशियातील पहिला ४ स्तरीय वाहतूक व्यवस्था गड्डीगोदाम येथे निर्माण झाली आहे.सदर निर्माण कार्य करताना अनेक अडचणी आल्या,5.67 किमी डबलडेकर उड्डाणपूल सर्वाधिक लांबीचा हा डबलडेकर उड्डाणपूल सिंगल कॉलम पिअरवर उभा असून स्थापत्य कलेचा अद्भूत उदाहरण आहे. यासोबतच तंत्रज्ञानाचा अतुलनीय वापर करून उड्डाणपुलांवर गड्डीगोदाम चौक,कडबी चौक,इंदोरा चौक,नारी रोड,ऑटोमोटिव्ह चौक ही पाच मेट्रो स्थानक बांधण्यात आली आहेत. या उड्डाणपूलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग आहे, दुसऱ्या स्तरावर मेट्रो धावत आहे आणि जमिन पातळीवर आधीच अस्तित्वात असलेला महामार्ग आहे. गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळ 1650 वजन क्षमतेचा स्टीलचा पूल तयार करण्यात आला आहे. देशातील ही पहिली रचना आहे, ज्यामध्ये चार स्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. तसेच उड्डाणपुलाच्या संरचनेत ‘रिब अॅन्ड स्पाइन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
या सोबतच मेट्रो ट्रेनचे कामकाज आणि ऑपरेशनल कंट्रोल सेंटरच्या इतर बाबीबाबत देखील त्यांना माहिती प्रदान करण्यात आली. मेट्रो ऑपरेशन्सच्या डॉट नेट,6-डी बीम मॉडेल, गेल्या काही वर्षांमध्ये साध्य केलेली प्रगती, अंमलबजावणीदरम्यानची माहिती मंत्री महोदयांना देण्यात आली. उल्लेखनीय आहे कि, या पूर्वी देखील इतर राज्याच्या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाची माहिती जाणून घेतली आहे.