चंद्रपूर: शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाअंतर्गत २८ बाह्यसंपर्क आरोग्य शिबीर होत आहेत. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७च्या वतीने ७ डिसेंबर रोजी हनुमान मंदिर, एकता चौक, पोलीस लाईन येथे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. आरोग्य तपासणी आणि लसीकरण शिबीरात शेकडो नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.
शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र ७च्या तुकूम अंतर्गत हनुमान मंदिर, एकता चौक, पोलीस लाईन येथे ७ डिसेंबर रोजी कोविड 19 लसीकरण शिबिरासह आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन माजी महापौर, नगरसेविका अंजली घोटेकर, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा उराडे यांच्या हस्ते झाले. बालरोगतज्ञ डॉ. प्रफुल्ल भास्करवार, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. नयना उत्तरवार आणि डॉ. देवयानी भुते यांनी नागरिकाची आरोग्य तपासणी केली. यावेळी शिबिरात सामान्य तपासणी, रक्त तपासणी, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची तपासणी करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांनी कोविड -१९ च्या लसीची मात्रा घेतली.