अरोली :- येथील वार्ड क्रमांक दोन स्थित श्रीराम भक्त हनुमान मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम भक्त हनुमान मंडळ व समस्त ग्रामवासी तर्फे चैत्र पौर्णिमा निमित्त दोन दिवसीय हनुमान जन्मोत्सव कार्यक्रमाला उद्या दिनांक 11 एप्रिल शुक्रवार सुरुवात होत आहे. शुक्रवारला दुपारी चार वाजता घटस्थापना ,रात्री नऊ ते बारा वाजता कीर्तन नंतर भजन संमेलन( जागृती). 12 एप्रिल शनिवारला सकाळी सहा वाजता हनुमान जन्म कथा पठण, सात वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठण व महाआरती , आठ वाजता प्रभात फेरी दिंडी, नऊ वाजता होम यज्ञ, दुपारी अकरा वाजता ता जि भंडारा, पो केसलवाडा (वाघ) मु माडगी (टेकेपार) ह भ प फत्तु वैद्य महाराज यांचे कीर्तन व गोपालकाला, सायं. सात वाजता महाआरती व नंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अशोक देवगडे ,उपाध्यक्ष डोमा मोहनकर, सचिव राजकुमार बावनकुळे, सदस्यगण वसंतराव उरकुडकर, उमाकांत देवतळे, माणिक मोहणे ,नथू ठाकरे, गजेंद्र तरटे, तुळसिदास वरखडे ,एकनाथ मसराम, संभा निकुळे, सहयोगी सदस्यगण विष्णू बावनकुळे, पवन हेडाऊ ,सदानंद बावणे, जागेश्वर बावनकुळे परिश्रम घेत असून समस्त ग्रामवासी सहकार्य करत आहे.