नागपूर् :- खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भ स्तरीय कबड्डी स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीतील अत्यंत चुरशीच्या लढतीत कारंजा येथील गुरूकुल क्रीडा मंडळाने विजय मिळविला.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियम येथे सुरु असेलेल्या स्पर्धेत सोमवारी (ता. 15) उपांत्यपूर्व फेरीतील सामने पार पडले. यात पुरूष गटात गुरूकुल क्रीडा मंडळाचा सामना उमरेड येथील छत्रपती क्रीडा मंडळाशी झाला. या अटितटीच्या सामन्यात गुरूकुल क्रीडा मंडळ संघाने छत्रपती क्रीडा मंडळाला अवघ्या एक गुणाने पराभवाचा धक्का देत विजय मिळविला.
महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये चक्रधर नगर येथील श्री गजानन क्रीडा मंडळ संघाने गडचिरोली येथील महाराणा क्रीडा मंडळ संघाविरुद्ध तब्बल 26 गुणांनी एकतर्फी विजय नोंदविला.
उपांत्यपूर्व फेरी निकाल
पुरूष
1. गोंडवाना सडक अर्जुनी (29) मात मराठा लॉन्सर्स खामला (ब) (10)
19 गुणांनी विजयी
2. एकलव्य क्रीडा मंडळ नागपूर (33) मात साईराम क्रीडा मंडळ रामटेक (12)
21 गुणांनी विजयी
3. सुभाष क्रीडा मंडळ रनाळा (36) मात विक्रांत स्पोर्टींग क्लब नागपूर (28)
12 गुणांनी विजयी
4. मराठा लॉन्सर्स महाल (21) मात सुभाष क्रीडा मंडळ हिंगणघाट (14)
7 गुणांनी विजयी
5. ओम अमर क्रीडा मंडळ सक्करदरा (34) मात सुवर्ण भारत क्रीडा मंडळ खापरखेडा (14)
20 गुणांनी विजयी
6. सुभाष क्रीडा मंडळ कॉटन मार्केट (39) मात महाराणा क्रीडा मंडळ गडचिरोली (17)
22 गुणांनी विजयी
7. सप्तरंग क्रीडा मंडळ नागपूर (30) मात संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर (12)
18 गुणांनी विजयी
8. श्री गणेश क्रीडा मंडळ नागपूर (41) मात एकलव्य क्रीडा मंडळ सावनेर (25)
16 गुणांनी विजयी
9. तरुण सुभाष सोनेगाव बोरी (37) मात न्यू ताज क्रीडा मंडळ नागपूर (25)
12 गुणांनी विजयी
10. साई क्रीडा मंडळ काटोल (34) मात जय भवानी क्रीडा मंडळ उमरेड (22)
12 गुणांनी विजयी
11. गुरूकुल क्रीडा मंडळ कारंजा (25) मात छत्रपती क्रीडा मंडळ उमरेड (24)
1 गुणाने विजयी
महिला
1. साई स्पोर्ट्स काटोल (31) मात रेणुका क्रीडा मंडळ अजनी (24)
7 गुणांनी विजयी
2. संघर्ष क्रीडा मंडळ नागपूर (35) मात त्रिरत्न क्रीडा कामठी (28)
7 गुणांनी विजयी
3. मराठा लॉन्सर्स महाल (42) मात रवींद्र क्रीडा मंडळ उमरेड (26)
16 गुणांनी विजयी
4. श्री गजानन क्रीडा मंडळ चक्रधरनगर (35) मात महाराणा गडचिरोली (9)
26 गुणांनी विजयी