संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- तालुक्यातील रविदास नगर येरखेडा येथे सतनामी जनजागृती मंडळाचे संत घासिदास बाबा यांची 267 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी प्रदेश भाजप अध्यक्ष व विधान परिषद सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांची हस्ते दीप प्रज्वलन व गुरु घासीदास बाबा यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार टेकचंद सावरकर, भाजप नागपूर जिल्हा महामंत्री अनिल निधान ,जिल्हा परिषद सदस्य मोहन माकडे, कामठी तालुका भाजप अध्यक्ष उमेश रडके,माजी सरपंच मंगला कारेमोरे, मनीष कारेमोरे ,उपसरपंच मंदा महल्ले पाटील ,ग्रामपंचायत सदस्य राजश्री धीवले, नरेश मोहबे ,आचल तिरपुडे, प्रिया दुपारे, ज्योती घडले , कुलदीप पाटील, अनिल भोयर, गजानन तिरपुडे ,सुमेध दुपारे समायाराम देशलहरे, कुमार धीवले , छोटु चंदनिया ,बिसास जोगी ,जेटू चंदनिया, दयादास देशलहरे ,नरेंद्र कोसोरिया, लक्ष्मीनारायण धीवले, ज्वाला धीवले, देव बंजारे उपस्थित होते पाहुण्याच्या हस्ते सतनामी समाजातील जेष्ठ समाज बांधवांच्या शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात मार्गदर्शन करताना खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे ,आमदार टेकचंद सावरकर म्हणाले सतनामी समाजातील तरुणांनी गुरु घासीदास बाबा यांचा आदर्श ठेवून समाज कार्य करण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन ग्रामपंचायत सदस्य राजश्री धिवले यांनी केले व आभार प्रदर्शन नरेश मोहबे यांनी मानले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.