संदीप कांबळे,कामठी
– कामठी तालुक्यात गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाचे उत्साहात स्वागत
कामठी ता प्र 2 :- गुढीपाडव्याने मराठी नववर्षाचे सुरुवात होत असून दोन वर्षाच्या कोरोनामुक्ती निर्बंधानंतर कामठी तालुक्यात आज गुढीपाडवा पर्व मोठ्या उत्साहाने साजरा करीत ठिकठिकाणी गुढी उभारुंन मराठी नववर्षाचे मोठ्या जल्लोशाने स्वागत करण्यात आले.तर गुढीपाडवा हा खरेदीच्या दृष्टीने साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जात असल्याने बाजारपेठेत वस्तु खरेदीकरांची चांगलीच गर्दी दिसून आली.तसेच बाजारपेठेत मोठ्या उत्साहचे वातावरण दिसुन आले.
गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि नववर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस ‘गुढीपाडवा’ म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला . दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते.यानुसार ठीकठिकानी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
गुढीपाडवा पर्व उत्साहाने साजरा
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com