नागपूर :- स्वीप अर्थात मतदारांच्या साक्षरतेसाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांतर्गत आज गुढी पाडव्याच्या औचित्याने जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात मतदार जागृतीची प्रातिनिधीक गुढी उभारण्यात आली. महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डॉ. अभिजीत चौधरी व डॉ. विपीन इटनकर यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात उभारली मतदार जागृतीसाठी गुढी
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com