नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दर बुधवारी मुंबई शहराचे पालकमंत्री केसरकर साधणार सुसंवाद

मुंबई :- मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर दर बुधवारी नागरिकांशी सुसंवाद साधणार आहेत. यासाठी ते मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ ते १२.४५ या वेळेत, तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात दुपारी १ ते ४ या वेळेत उपस्थित राहणार आहेत.

या अनुषंगाने मुंबई शहरातील सर्व नागरिकांनी शासकीय योजना, विकासकामे याबाबतच्या सूचना तसेच इतर समस्या असल्यास उद्या बुधवार ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याबाबतच्या निवेदन अथवा लेखी अर्जासह उपस्थित राहावे. नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच इतर विषयांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात उपस्थित राहता येईल, असे आवाहन पालकमंत्री श्री.केसरकर यांनी केले आहे. ज्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठक असल्यास पालकमंत्री गुरुवारी उपलब्ध राहतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्रात जातीय सलोखा ‍बिघडवणाऱ्या नेत्यांवर भाजपाचे लक्ष

Tue Oct 3 , 2023
– मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार ॲड. आशिष शेलार यांची माहिती मुंबई :-राज्यामध्ये काही विशेष पक्ष, गट आणि त्यांचे विशेष नेते हे महाराष्ट्रातील जाती -जातीमध्ये विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी काही पक्ष, काही गट आणि काही नेते आणि काही गटाचे नेते हे राज्यातलं जातीय सलोख्याचे वातावरण बिघडवण्याचा तर प्रयत्न करत नाहीत ना याची माहिती आजच्या बैठकीत घेण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com