-बोधी फौंडेशन कातलाबोडीला द्वितीय तर जय सेवा क्रीडा मंडळ येरणगाव तृतीय
नागपूर,दि.18 : बोधी फौन्डेशन, नागपूर तर्फे ‘पालक मंत्री चषक : खुली कब्बडी स्पर्धाचे’ मौजा कातलाबोडी ता काटोल येथे आयोजन करण्यात आले होते.
समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक इंडोनेशियाचे विक्टर अशेर, बंगलोर मेट्रो रेलचे संचालक नागसेन ढोके, ऑफिसर्स फोरमचे सचिव शिवदास वासे, मेमोरील ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय ढोके, सिद्धार्थ ढोके, समाज कल्याणचे उपसंचालक सिद्धार्थ गायकवाड, रा. स.तुकडोजी महाराज नागपूर युनिवर्सिटीचे उपकुलसचिव अनिल हिरेखन, बोधी फौन्डेशनचे अध्यक्ष डॉ सुशांत मेश्राम, ललित खोब्रागडे आणि कब्बडी स्पर्धेच्या आयोजिका अर्चना खोब्रागडे प्रामुख्याने उपस्थित होते.
एकलव्य क्रीडा मंडळ, नागपूर आणि बोधी फौंडशन, कातलाबोडी यांच्यात अंतिम सामना झाला. अंतिम सामन्यात एकलव्य क्रीडा मंडळ विजयी झाला. त्यांना ३५०००रु रोख, चषक आणि खेळाडूंना मेडल्स देण्यात आले. उपविजेतेपद बोधी फौन्डेशन यांनी पटकावले व त्यांना २५००० रु रोख, चषक आणि खेळाडूंना मेडल्स देण्यात आले. त्याचबरोबर तिसरे पारितोषिक जय सेवा क्रीडा मंडळ येरणगाव यांना १५०००रु रोख, चषक आणि खेळाडूंना मेडल्स देण्यात आले. उत्तेजनार्थ पारितोषिक ७०००रु रोख चषक आणि मेडल, रॉयल रम्बल क्लब ला देण्यात आले व्यायक्तिक पारितोषिक बेस्ट रेडर – सारंग देशमुख (एकलव्य क्रीडा मंडळ, नागपूर) आणि बेस्ट डीफेंडर- राहुल लटवार (बोधी फौन्डेशन, कातलाबोडी) ला प्रत्येकी १५००रु आणि चषक देण्यात आले. परितोष वितरण समारंभ नंतर प्रमुख पाहुण्यांनी च्या हस्ते ध्वज अवतरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्चना खोब्रागडे यांनी मांडले. कार्यक्रमाचे संचालन सुरेंद्र वानखेडे आणि मार्गवी खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन ललित खोब्रागडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यामागे मनीष गौर, मयूर भलावी, गीतेश अनभोरे, बाबारावजी भड, विजय खंडाते, नितेश कोवे, रवी मसराम, अंकित भड, राहुल भड, विक्रम येवले, ऋषभ साठे, विजय नेहारे, अंकित डोंगरे, कुलदीप इरपाची, कमलेश रंगारी, राम कोवे, योगेश कोवे यांनी प्रयत्न केले.