नागपूर :- संत सेवालाल महाराज यांची जयंती आज विभागीय आयुक्त कार्यालयात साजरी करण्यात आली. सामान्य प्रशासन उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात नायब तहसीलदार आर.के. दिघोळे, विवेक राठोड, नितीन डोईफोडे, नाझर अमित हाडके यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.