मंत्रालयात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

मुंबई :- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अंत्योदय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव दीपक मोरे, अवर सचिव सचिन कावळे, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यासह मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना अभिवादन

Thu Sep 26 , 2024
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंत्योदयचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना बुधवारी (ता:25) जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर यांच्या हस्ते मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात स्थित पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या उपायुक्त विजया बनकर, सहायक आयुक्त श्याम कापसे, अशोक घरोटे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com