मनपात छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन

-शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात

नागपूर :- महाराष्ट्राचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा शिवराज्याभिषेकोत्सव दिन सोहळ्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात सर्वप्रथम मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राला माल्यार्पण केले. तसेच उपमहापौर कक्षातील शिवराज्याभिषेक सोहळाच्या तैलचित्रास अभिवादन करीत पुष्प अर्पण केले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख तथा उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, स.प्र.विचे सहाय्यक अधीक्षक राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, रोहिदास राठोड, राजेश गजभिये यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

Fri Jun 7 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा कामठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुरेश मोठे यांच्या मुख्य उपस्थितीत 6 जून शिवराज्यभिषेक सोहळा निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून शिवराज्यभिषेक सोहळा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी आरोग्य सहाय्यक डॉ धिरेंद्र सोमकुवर,कृष्ठरोग तज्ञ मनोहर येळे, कामेश्वर शिलेकर,सचिन राखडे,चंदा माकडे,आदी कर्मचारी गण उपस्थित होते. Follow us on […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com