संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालयाच्या विशेष दिन कार्यक्रम समितीतर्फे देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीद-ए-आजम भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना २३ मार्च रोजी शहीद दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शहीद-ए-आजम भगतसिंग, सुखदेव राजगुरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे समन्वयक व इतिहास विभाग प्रमुख डॉ.जितेंद्र सावजी तागडे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करतांना हुतात्मा दिनाची माहिती देऊन हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.मनिष चक्रवती यांनी राष्ट्र सर्वोपरि हा नारा देत हुतात्म्यांना अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. रेणू तिवारी यांनी विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेण्याचे आव्हान केले. यावेळी बी, ए. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी खुशी शर्मा हिने विद्यार्थ्यांना शहीदांच्या विचारांवर मार्गक्रमण करण्याचा सल्ला दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विनय चव्हाण, आय, क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. प्रशांत धोंगळे यांनी योगदान दिले. याप्रसंगी राष्ट्रिय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे, डॉ.जयंत रामटेके, डॉ.अझहर अबरार, डॉ.समृद्धी टापरे, ग्रंथपाल शिल्पा हिरेखान यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जितेंद्र सावजी तागडे तर आभार डॉ.आशिष थूल यांनी मानले.