कन्हान :- डॉ बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनि र्वाण दिनी संघपाल सामाजिक संस्था रायनगर कन्हान व्दारे विशेष वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.
संघपाल सामाजिक संस्था, रायनगर कन्हान द्वारे बोधीसत्व परम पूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरनिर्वाण दिनी विशेष वंदना घेऊन माल्यार्पण कार्यक्रम आंबेडकर चौक आणि समता बुद्ध विहार येथे संघपाल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला. यावेळी विश्वनाथ पोहरे, महेंद्र बेलेकर, भारत पगारे, रिंकेश चवरे, हर्ष पाटील, शैलेश शेळके, सुकेशिनी बागडे, प्रतिभा उके, कांता नाईक, शिला पगारे, संध्या बेलेकर, इंद्रायणी पाटील, रमा भेलावे, प्रतिक्षा चवरे, वासे, पौर्णिमा सोमकुवर, कविता मेश्राम, कुसुम गोटवाड, पुष्पकला रामटेके, भावना वानखेडे, विमल वानखेडे, सविता घरडे, शांता चवरे, कु. वैष्णवी गडपायले, शालिनी राऊत, इंदुबाई राऊत आदीनी प्रामुख्याने उपस्थित राहुन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.