संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कामठी तालुक्यात विविध सामाजिक,राजकिय संघटनेसह शासकीय निमशासकीय कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.
यानुसार कामठी येथील जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला कांग्रेस च्या वतीने माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या हस्ते माल्यार्पण करून मानवंदना करीत सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी येरखेडा ग्रा प च्या सरपंच सरिता रंगारी, पंचायत समिती सदस्य सुमेध रंगारी, माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर,राजकुमार गेडाम,प्रमोद खोब्रागडे,सलामत अली, प्रकाश लाईनपांडे,कुसुम खोब्रागडे, निकिता आदी उपस्थित होते.
भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती आघाडी च्या वतीने आज बुधवारला सकाळी महापरिनिर्वाण दिवस निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन जयस्तभं चौक कामठी स्थित भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात करण्यात आले .या कार्यक्रमात भाजपा कामठी शहर अध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट, भाजपा कामठी शहर अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष विक्की बोंबले यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृति पुतळ्याला माल्यार्पण केले ,या वेळी भाजपा पदाधिकारी नरेश कलसे, विजय कोंडुलवार,उज्वल रायबोले, लाला खंडेलवाल,संजय कनोजिया, प्रतिक पडोळे,अवि गायकवाड़,शफीक शेख,कपिल गायधने, पंकज वर्मा,विलास सिंगाड़े,अतुल मानवटकर,रविंद्र मरई,शानु ग्रावकर,कार्तिक चव्हान,निलेश सकतेल,कमल यादव,आशिष रामटेके, बादल कठाने,बिरजू चहांदे,रितेश चंद्रिकापुरे,अभिषेक कनोजे,रमेश ठाकरे,प्रभा राऊत, गायत्री यादव, चंदा तुरसकर, किरण मानवटकर, संगीता अग्रवाल, सुषमा शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते .
विश्वरत्न , परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जयस्तंभ चौक कामठी येथे विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दिनेश पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले यावेळी कुंदन मेश्राम,, राजु बोरकर,,अनिरुद्ध तांबे,,सुबोध चांदोरकर, दिनेश माटे,,शाहीन परवीन,,साईस्ता परवीन,,हेमलता शरमा, छाया केळेकर,,कल्पना मेश्राम शरद लोणारे ईत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.
बसपा च्या वतीने शहराध्यक्ष विनय ऊके यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सामूहिक अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बसपाचे पदाधिकारी ,कार्यकर्तागण उपस्थित होते तसेच वंचीत बहुजन आघाडी कामठी शहर च्या वतीने शहराध्यक्ष दीपक वासनिक यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना वाहण्यात आली, याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत नगरकर, नरेश वाघमारेसह आदी कार्यकर्ता गण उपस्थित होते.शिवसेना कामठी शहर च्या वतीने शहराध्यक्ष मुकेश यादव यांच्या मुख्य उपस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत सामूहिक अभिवादन वाहण्यात आले.याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी राध्येध्यम हटवार तसेच कार्यकर्ता गण उपस्थित होते.
कामठी नगर परिषद च्या वतीने विक्रम चव्हाण यांच्या हस्ते जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी प्रदीप भोकरे, रुपेश जैस्वाल आदी उपस्थित होते.