मुंबई :- मराठी वृत्तपत्राचे जनक, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव सचिन कावळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी राजेंद्र बच्छाव, नितीन राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून यावेळी अभिवादन केले.