हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

– उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष

अजित पवार यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा

मुंबई :- महान हॉकीपटू, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी क्रीडा क्षेत्रातील मेजर ध्यानचंद यांच्या कामगिरीचे, योगदानाचे स्मरण करुन त्यांना भावपूर्ण अभिवादन केले आहे. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंती ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून आपण साजरी करतो. मेजर ध्यानचंद यांनी हॉकीच्या मैदानात भारतासाठी अविश्वसनीय कामगिरीची नोंद केली आहे. त्यांच्या कारकिर्दीत भारताने सन 1928, 1932 आणि 1936 असे तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले. त्यांच्या खेळाची जादू अनेक दशकानंतर आजही भारतीयांच्या मनावर कायम आहे. केंद्र सरकारने 1956 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले. मेजर ध्यानचंद हे भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या जयंतीदिनी साजरा होणारा राष्ट्रीय क्रीडा दिन भारतीय क्रीडा जगतासाठी सर्वात महत्वाचा दिवस आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राने क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमीका नेहमीच घेतली आहे. स्वतंत्र क्रीडा धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आज (२८ ऑगस्ट) पुणे येथे झालेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या निमित्ताने भारतासाठी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते पैलवान खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिवस ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. राज्यातील सर्वोच्च शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांच्या रोख रकमेत भरीव वाढ करण्याची घोषणा राज्य सरकारच्यावतीने करण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्राला आणि खेळाडूंना प्रोत्साहन देत खेळांच्या प्रसार-प्रचारासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, हीच हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांना खरी आदरांजली ठरेल, अशा भावना व्यक्त करुन राज्यासह देशातल्या खेळाडू, प्रशिक्षक, कार्यकर्ते, हितचिंतकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

दर्जेदार कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील संघर्षाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवावी - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार 

Tue Aug 29 , 2023
मुंबई :- मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या संघर्षाची माहिती नवीन पिढीसह देशभरातील नागरिकांना होणे आवश्यक आहे. मुक्तीसंग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने यानिमित्त मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करून मुक्तीसंग्रामाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक घेण्याबाबत मुख्यमंत्री यांना विनंती करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली. मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com