मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचेकडून राज्यपाल बैस यांना निरोप; नौदलातर्फे मानवंदना

मुंबई :-आपला कार्यकाळ पूर्ण करीत असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांना आज (३० जुलै) महाराष्ट्र शासनातर्फे राजभवन येथे भावपूर्ण न‍िरोप देण्यात आला.

राज्यपालांच्या कक्षात झालेल्या एका छोटेखानी सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल बैस व त्यांच्या पत्नी रामबाई बैस यांचा शाल व भेटवस्तू देऊन सत्कार केला.

आपल्या कार्यकाळात आपणाला राज्य शासनाकडून उत्तम सहकार्य मिळाल्याबद्दल राज्यपालांनी सर्वांचे आभार मानले. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी देखील राज्यपालांचे वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

पालकमंत्री दीपक केसरकर, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त मुख्य सचिव राजशिष्टाचार मनिषा म्हैसकर व इतर वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी राज्यपालांना राज्यातील गडकिल्ल्यांची माहिती असलेले पुस्तक भेट दिले.

निरोप सोहळ्यानंतर भारतीय नौदलातर्फे राज्यपालांना मानवंदना देण्यात आली. राज्यपाल बैस यांनी त्यानंतर रायपुरकडे प्रस्थान केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मंत्रिमंडळ बैठक : मंगळवार, दि.30 जुलै 2024 एकूण निर्णय -10

Tue Jul 30 , 2024
सामाजिक न्याय विभाग   वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे दरडोई अनुदान वाढविले विविध विभागांच्या वसतीगृहे, आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या दरडोई अनुदानात भरीव वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सामाजिक न्याय, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण, आदिवासी विकास, महिला व बालविकास या विभागांमार्फत सुरु असलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानीत संस्थांमधील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे दरडोई परिपोषण अनुदान आता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com