– कार्यकर्त्यांना दिशा निर्देश दिले
नागपूर :- बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या अध्यक्षपदी ऍड परमेश्वर गोणारे ह्यांची निवड झाल्यानंतर आज त्यांच्या नागपूरातील प्रथम आगमना प्रसंगी बसपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे रवी भवन येथे भव्य स्वागत केले.
या प्रसंगी प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेशचे सचिव व विदर्भ झोनचे इन्चार्ज पृथ्वीराज शेंडे, इंजि दादाराव उईके, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, जिल्हा प्रभारी राहुल सोनटक्के, विलास सोमकुवर, शहराध्यक्ष शादाब खान, शहर प्रभारी विकास नारायणे, माजी प्रदेश महासचिव मंगेश ठाकरे, एड प्रल्हाद हिवराळे, गौतम उजगरे, मोहम्मद शफी, माजी प्रदेश सचिव व महिला नेत्या रंजना ढोरे तसेच अभिलेश वाहाने, योगेश लांजेवार, सदानंद जामगडे, सचिन मानवटकर, राजकुमार बोरकर, भास्कर कांबळे, अंकित थूल, एड विरेश वरखडे, मनोज निकाळजे, जनार्दन मेंढे, मनोज गजभिये, पराग रामटेके, राष्ट्रपाल वाघमारे, महेंद्र मेश्राम, रोशन गौरखेडे, अयप्पा सहारे, सावलदास गजभिये तारा गौरखेडे, शशिकांत मेश्राम, वीरेंद्र कापसे, लक्ष्मीबाबू सूर्यवंशी, मो इब्राहिम टेलर, महेंद्र मेश्राम, अता ऊल्ला अन्सारी, नितीन वंजारी, भानुदास ढोरे, सुमित जांभुळकर, राजेश पाटील, जगदीश गजभिये, रोहित ईलपाची, अनिल साहू, विवेक सांगोळे, परेश जामगडे, रंजीत सहारे, राममुरत प्रसाद, गौतम सरदार, राहुल उके, सुरेश मानवटकर, वाळके, पंकज नाखले, संगीत इंगळे, रमा इंगळे, परवेज भाई, सुभाष सुखदेवे, आकाश खोब्रागडे, मोहम्मद शफाकत गुड्डू, गौतम पाटील, चंद्रशेखर कांबळे, अरविंद तायडे आदि आजी-माजी पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
बसपाचे प्रदेशाध्यक्ष एड परमेश्वर गोणारे हे मराठवाडा, पुणे, मुंबई झोनचे दौरे केल्यावर विदर्भातील दौऱ्यासाठी आज सकाळी ते नांदेडहून नागपूरात आले होते.
प्रदेशाध्यक्षांनी हार तूरे स्वीकारल्या नंतर नागपुर ग्रामीण, शहर, विधानसभा, सेक्टर व बूथ स्तरावरील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांची ओळख झाल्यावर त्यांना दिशा निर्देश दिले. अनेक वर्षानंतर प्रथमत:च प्रदेशाध्यक्षांनी प्रत्यक्ष कार्यकर्त्यांशी ओळख करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यानंतर त्यांना दिशा निर्देश देऊन 15 जानेवारी रोजी होणारा जनकल्याणकारी दिन समारोह कार्यक्रम यशस्वी करण्याचे अभिवचन घेतले. कार्यकर्त्यांनी सहज स्वीकारले. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश बसपाचे मीडिया प्रभारी व कार्यालयीन सचिव उत्तम शेवडे यांनी दिली.