कोदामेंढीत आजपासून भव्य टेनिस थ्रो बॉल क्रिकेट स्पर्धेला सुरुवात 

अरोली :- दरवर्षीप्रमाणे यंदाही येथील आदर्श क्रिकेट क्लब च्या वतीने बँक ऑफ इंडिया समोरील पटांगणात भव्य टेनिस थ्रो बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन उद्या दिनांक 24 जानेवारी शुक्रवारपासून ते अंतिम सामन्यापर्यंत करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख ,ग्रामपंचायत कोदामेंढी सरपंच आशिष बावनकुळे ,प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक हटवार ,शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे, युवा काँग्रेस उपाध्यक्ष हिमांशू रोडे यांच्याकडून संयुक्तरित्या प्रथम पारितोषिक 25000 रुपये, माजी सरपंच भगवान बावनकुळे, युवा मोर्चा अध्यक्ष वैभव हटवार, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत अडेगाव उपसरपंच उत्तम मेश्राम यांच्याकडून संयुक्तरित्या द्वितीय पुरस्कार 13000 रुपये, या रोग रकमेसह गावातील व परिसरातील सामाजिक व राजकीय पदाधिकारी पुढारी, मान्यवर व व्यापारी मंडळीकडून मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट अंपायर, हॅट्री चौकार, हॅट्रिक षटकार , हॅट्रिक विकेट असे बक्षीसही देण्यात येणार आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनाला जिल्हा परिषद सदस्य योगेश देशमुख, शिवसेना तालुकाप्रमुख प्रशांत भुरे ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक हटवार, ग्रामपंचायत कोदामेंढी सरपंच आशिष बावनकुळे, उपसरपंच गोपाल गिरमेकर, ग्रामपंचायत सदस्य गण रवी ठवकर ,अनिता हटवार, विष्णू बावनकुळे, रूपाली ठाकरे, स्वाती गौरखेडे ,कोमल खडसे, अंजली मोहर्ले, सदानंद मेश्राम, खुशाल शिवणकर, हेमलता देवतळे, पोलीस पाटील प्रकाश देवतळे, माजी सरपंच भगवान बावनकुळे, नरेश बावनकुळे, माजी उपसरपंच प्रकाश मेश्राम, तंटामुक्ती अध्यक्ष राम नीमकर ,सामाजिक कार्यकर्ता निलेश बावनकुळे ,सह गावातील व परिसरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी पुढारी व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून या स्पर्धेच्या क्रिकेटपटूंनी लाभ घेण्याचे आव्हान आदर्श क्रिकेट क्लब चे पदाधिकारी राहुल रामचंद हटवार ,सारंग हटवार ,राहुल कारेमोरे, गौरव बावनकुळे, हिमांशू बावनकुळे, भूमेश बावनकुळे, अतुल बावनकुळे, विकी कारेमोरे, आकाश वाघमारे, सागर बावनकुळे ,निखिल मसराम, उमेश बावनकुळे ,दिनेश बावनकुळे, स्वप्निल बावनकुळे, शुभम वैरागडे, अनिकेत बावनकुळे, गणेश वाघमारे, आकाश बावनकुळे, प्रशांत बावनकुळे ,अमोल (दादू) बावनकुळे, गोलू बावनकुळे ,हर्षल तांबुलकर, यश हटवार ,संदीप बावनकुळे, समीर बावनकुळे, गौरव बावनकुळे ,शेखर बावनकुळे, रोशन बावनकुळे ,ऋषभ हटवार, विराज बावनकुळे, रवी काचुरे ,भावेश पात्रे ,मयूर बरबटे, श्लोक भिवगडे यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

विश्रांती कॉन्व्हेंट निमखेडा येथे आनंद मेळावा 

Fri Jan 24 , 2025
अरोली :- निमखेडा येथील स्वर्गीय इंदिरा गांधी उच्च प्राथमिक व महाविद्यालयाशी संलग्नित विश्रांती कॉन्व्हेंट मधील आवारात नुकताच आनंद मेळावा पार पडला. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात खाद्यपदार्थांचा स्टॉल लावला होता. विविध प्रकारच्या स्वादिष्ट खाद्यपदार्थांसह हा कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला. स्टॉल तयार करण्यासाठी आणि उभारण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि त्यांनी तयार केलेल्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या पदार्थांमधून त्यांची मेहनत दिसून आली .फूड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!