अरोली :- मौदा तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिकांकरिता महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भव्य जनसंवाद कार्यक्रम उद्या दिनांक 23 मार्च रविवारला सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वृंदावन लान मौदा येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
तालुक्यातील समस्याग्रस्त नागरिकांनी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्या समस्या लेखी स्वरुपात वृंदावन लान मौदा येथे घेऊन याव्या, असे जाहीर आव्हान मौदा तहसीलदार दत्तात्रय निंबाळकर यांनी केले आहे व त्या आव्हानाची प्रत मागील एक आठवड्यापूर्वीपासून सोशल मीडियावर वायरल होत आहे. भव्य जनसंवाद कार्यक्रम भव्य दिव्य होण्यासाठी तालुक्यातील मोठमोठ्या गावात जनसंवाद कार्यक्रमाचे मोठमोठे फलक लावण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांच्या स्टेटसवर व विविध ग्रुप मधून या जनसंवाद कार्यक्रमाच्या प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे.