– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
Ø जिल्ह्यातील ५० हजार महिला होणार सहभागी
Ø विभागीय आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांकडून घेतला तयारीबाबत आढावा
Ø ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात होणार लाभाचे थेट वाटप
नागपूर :- महिला सक्षमीकरणाकरिता राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या महत्वाकांक्षी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना लाभ वाटपाच्या टप्पा-२ कार्यक्रमाचे भव्य आयोजन येत्या 31 ऑगस्ट रोजी येथील रेशीम बाग मैदानावर होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होईल.
या विशेष कार्यक्रमात ५० लाख पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात लाभाचे थेट वाटप करण्यात येणार आहे. शहरी व नागरी भागातील ५० हजार महिला या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहात आयोजित या आढावा बैठकीस, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे ,महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा,नागपूर सुधार प्रण्यासचे अध्यक्ष संजय मिणा यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता, पाणी पुरवठा, वाहतूक व्यवस्था आदींसह शासनाच्या विविध विभागांकडे सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत बिदरी यांनी मार्गदर्शन व सूचना केल्या.खासकरून त्यांनी पुणे येथे पार पडलेल्या या योजनेच्या शुभारंभ व लाभार्थ्यांना वाटपाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमा प्रमाणेच नागपुरातील कार्यक्रम यशस्वी व नेटका करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी प्रशासनाला दिल्या. सर्व विभागाने नियोजित जबाबदाऱ्या काटेकोर व वेळेत उत्तमरीत्या पार पाडण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
नुतनीकृत सभागृहाचे उद्घाटन
तत्पूर्वी, बिदरी यांच्या हस्ते विभागीय आयुक्तालयातील नुतनीकृत सभागृहाचे फित कापून उद्घाटन झाले. नूतनीकरणानंतरचे या सभागृहातील ही पहिलीच बैठक ठरली.