– शेकडो भाविकांनी घेतला लाभ
रामटेक :- श्रावण सोमवार निमित्त रामटेक तालुक्यात प्रथमच वाहीटोला येथे भव्य कावड़ यात्रा चे यशस्वी आयोजन बम बम भोलेनाथ मित्र परिवार तर्फे करण्यात आले. दरम्यान हनुमान मंदिर चारगाव ते दुर्गा माता मंदिर वाहिटोला मार्गे श्री संकटमोचन हनुमान महादेव मंदिर पiचगावदरम्यान कावड यात्रा काढण्यात आली. यावेळी असंख्य भक्तमंडळी महिला समुदाय सहभागी होत देवाधी देव महादेवाला सर्वांनी अभिषेक केलें.
विशेष म्हणजे तालुक्यात प्रथमच कावड द्वारे अभिषेक करण्याचे दृश्य लोकांनी तालुक्यात प्रथमच पाहिले. दरम्यान आयोजकांनी सर्व नियोजन व्यवस्था व कावड यात्रा सुयोग्य रितीने पार पाडली. दरम्यान आयोजकांनी सर्व भक्तमंडळींचे आभार मानले. आयोजकात धर्मेंद्र शुक्ला,नितीन बंडीवार, नरसिंह गुडी, अतिश निंबाळकर, ओमेश्वर शुक्ला, विकास शुक्ला,संजीव भारद्वाज,शुभम काठोते प्रशांत महाधुरे आकाश भारद्वाज, ,निखिल शुक्ला, महेंद्र ठाकूर, निखिल ठवरे,विवेक शुक्ला,गोलू काठोते,यश सोनवाने,आर्यन भारद्वाज, सूर्यकांत कठोते व इतर सर्वांनी आयोजनासाठी दिवसरात्र परिश्रम घेतले.