गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील माहे जानेवारी, 2024 ते डिसेंबर, 2024 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, नवनिर्मीत, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक तसेच निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य व थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांचा पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
यानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 09 जुलै 2024 असा असून हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी- 09 जुलै ते 15 जुलै 2024 पर्यत राहणार आहे. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी दिनांक 19 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे.
प्रसिध्द केलेल्या प्रारुप मतदार यादीवर संबंधीत तहसिल कार्यालयास हरकती व सूचना प्राप्त झाल्यानंतर नियमाप्रमाणे प्रभाग निहाय मतदार यादी अंतिम करण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी प्रारुप मतदार यादीवर हरकती व सुचना सादर करण्याचे आवाहन निवडणूक विभागाद्वारे करण्यात आले आहे.