– शाळकरी मुला-मुलींना अश्लील लिंक, जाहिराती, घाणेरडे व्हिडीओ अचानकपणे मोबाईलवर दिसू लागल्याने त्रास होतो, गुगल ला आळा घालण्यासाठी गुगलवरिल शासनाने कायदा काढावा.
चंद्रपूर :- सर्व घरांमध्ये लहान-मोठ्या मुला-मुलींच्या हातात मोबाईल आहेत आणि कोविड आल्यानंतर पालकांना शाळा संस्थांकडून त्यांच्या मुलांना शाळेत ऑनलाईन अभ्यासासाठी मोबाईल फोन उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले होते, त्यामुळे सर्व वयोगटातील मुलांना मोबाईलवर अभ्यास करण्यास सांगितले. मोबाईल वापरत असताना अचानक मोबाईलवर घाणेरडे अश्लील फोटो, फोटो, व्हिडिओ दिसू लागतात. ज्याचा परिणाम मुलांवर गुगलच्या लिंक्स द्वारे होतो, जो कोणत्याही पालकांना नको असेल, त्यांचा मुलांवर खूप वाईट परिणाम होतो.
गुगल विषयी संसदेत नविन कायदा करून हे थांबवण्यास भाग पाडावेत. भारत सरकारने यासाठी Google कोड तयार करून प्रसारित करावे” की ज्यांना अशा अश्लील लिंक्स, व्हिडिओ फोटो पहायचे आहेत त्यांनी हे कोड नंबर वापरावेत आणि तो कोड नंबर फक्त 22 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषानांच दिला जावा, जेणेकरून या अश्लील व्हिडीओची लिंक्स आणि फोटो अचानकपणे दिसू नयेत, जेणेकरून छोट्या मुलांना शिक्षणाच्या वाईट प्रभावापासून वाचवता येईल, भारत सरकारने बंद करण्यासाठी कठोरपणे योग्य पावले उचलावी. चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस येथील समाजसेवक ईबादुल सिद्धीकी यांनी अनेकदा केंद्र सरकारला व महाराष्ट्र शासनाला गुगल संदर्भात पत्र पाठविले भारत देशाचे राष्ट्रपती दिल्ली, नरेंद्र मोदी पंतप्रधान, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सूचना एवं प्रसारणमंत्री नवी दिल्ली आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री या सर्वांना या संदर्भात पत्रव्यवहार केली.
ईबादुल सिद्धीकी यांच्या मागणीवरून महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भारत सरकारचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून कायदा करून त्यावर बंदी घालण्याची विनंती केलेली आहे. परंतु या संदर्भात शासनाने कठोर पावली उचलले नाहीत ! यासाठी योग्य पावले उचलावेत. व गंभीरतेने दखल घ्यावी. अशी मागणी घुग्घुस चे समाजसेवक ईबादुल सिद्दिकी यांनी प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे.