संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– 27 व 28 एप्रिल ला आजनीत ‘शासकीय योजनांची जत्रा’ उपक्रमाचे आयोजन
कामठी ता प्र 24 :- राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवित आहे.शासकीय योजनापासून कुणीही वंचीत राहू नये याचा विचार करून शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून नागपूर जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी तालुक्यात हा उपक्रम राबविण्यात येणार असून येत्या 27 व 28 एप्रिल ला कामठी तालुक्यातील आजनी गावातील सेंट जेनेली शाळेच्या आवारात ‘शासकीय योजनांची जत्रा’ हे दोन दिवसीय उपक्रम राबविण्यात येणार आहे तेव्हा या उपक्रमाचा जास्तीत जास्त गरजुनी लाभ घ्यावा असे आवाहन कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.
.मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान करण्यासाठी महाराजस्व अभियान योजनांची जत्रा 2023 याबाबत कामठी तहसीलदार अक्षय पोयाम यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम तालुकास्तरावर राबविण्यात येणार आहे .कामठी तालुक्यातील आजनी गावात 27 व 28 एप्रिल या दोन दिवशी हे अभियान घेण्यात येणार आहे .
या शासकीय योजनेच्या जत्रेत संजय गांधी निराधार योजना,वनविभाग,आरोग्य,पशुवैद्यकिय,पशुसंवर्धन विभाग,पंचायत समिती, शिक्षण विभाग,कृषी विभाग ,नगर परिषद, नगर पंचायत आदी विभागातील महसूल प्रमाणपत्र,7/12फेरफार, वनहक्क,माझी कन्या भाग्यश्री, बेबीकीट,सायकल वाटप,सायकल धनादेश वाटप,,विद्यार्थी उपस्थिती भत्ता प्रमाणपत्र,सुवर्ण महोत्सवी उपस्थिती भत्ता प्रमाणपत्र ,माती परीक्षण,जॉब कॉर्ड वाटप, ईश्रम कार्ड वाटप,आयुष्यमान भारत कार्ड वाटप,घरकुल लाभार्थी रॉयल्टी वाटप,घरकुल पूर्णत्व प्रमाणपत्र,संगायो सर्व योजना ,वीज जोडणी ,आधार अपडेट,चरित्र प्रमाणपत्र,ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र,सिंचन,जन्म मृत्यू ,विवाह नोंदणी प्रमाणपत्र आदी प्रकारचे प्रमाणपत्र वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रशासन ,शासन आणि जनता एकत्र आल्यास सामान्य जनतेच्या कोणत्याही समस्या शिल्लक राहू नये यासाठी शासकीय योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी एकच छताखाली सर्व अधिकारी जनता जत्रेच्या रुपात आणून जनतेला विविध योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.गावागावात या योजनांची माहिती दवंडी तसेच स्पीकरच्या माध्यमातुन नागरिकांना देणे सुरू असून तलाठी,मंडळ अधिकारी ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.येत्या 27 व 28 एप्रिल रोजी कामठी तालुक्यातील आजनी येथे होणाऱ्या या शासकीय योजनेच्या जत्रेत नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घावा असे आवाहन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले आहे.