शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जागतिक परिचारिका दिवस साजरा

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 12:-आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्मदिवस 12मे हा संपूर्ण जगात परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो .याच पाश्वरभूमीवर (आज12मे) ला जागतिक परिचारिका दिनानिमित्त शासकीय उपजिल्हा रुग्णालयात सकाळी 10 वाजता वैद्यकीय अधिकारी डॉ , डॉ धीरज चोखांद्रे ,डॉ वाघमारे, डॉ अली यांच्या मुख्य उपस्थितीत आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करीत केक कापून जागतिक परिचारिका दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
यावेळी डॉ चोखांद्रे तसेच डॉ वाघमारे , डॉ अली यांनी आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जीवनशैलीवर प्रकाश टाकीत आपले विचार व्यक्त करीत समस्त परिचरिकाना आजच्या जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ अली, अधिप्रिसेविका सुरेखा चौबे, परिसेविका भागवत, अधिसेविका जीराफे, ब्रदर इमरान शेख,अधिसेवीका हाजरा अन्सारी, परिचारिका वैशाली मिलगीलावार यासह समस्त परिचरिकागण व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी गन उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

आंबेडकर चौक कन्हान येथे स्टार बस चा थांबा द्या

Thu May 12 , 2022
संदीप कांबळे,कामठी  सकाळी व सायंकाळी स्टार बस च्या फे-या वाढविण्या याव्या. कन्हान : – बर्डी नागपुर ते टेकाडी फाटा पर्यंत स्टार बस सेवा सुरू असुन आंबेडकर चौक कन्हान येथे स्टार बस थांबत नसल्याने या परिसरातील प्रवाशी नागरिकांना त्रास करावा लागत असल्याने स्टार बस चा आंबेडकर चौक येथे थांबा देण्यात यावा तसेच सकाळी व सायंकाळी स्टार बस च्या फे-या वाढविण्या याव्या. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com