नागपूर :- दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे. दिल्लीच्या जनतेने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखविल्याबद्दल जनतेचे आभार मानत भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी भ्रष्टाचाराला लाथाडून दिल्लीच्या जनतेने विकासाचे सरकार आणल्याची प्रतिक्रीया दिली आहे.
देशात भ्रष्टाचाराला थारा नाही हे दिल्लीच्या सुजाण जनतेने दाखवून देत देशाच्या जनतेप्रमाणेच आपला विश्वास भारतीय जनता पार्टीवर दाखविला आहे. हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील नवं भारत आहे. याची जाण ठेवून जनतेने भ्रष्टाचाराने लथपथ असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या सरकारला स्पष्टपणे नाकारत भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारचा स्वीकार केला आहे. हे यश भाजपचे सामान्य कार्यकर्ते आणि जनतेचे आहे. या विजयासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदनही महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले. याशिवाय त्यांनी पक्षाकरिता विजयश्री खेचून आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार देखील मानले.