शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करणार – मंत्री उदय सामंत

मुंबई :- राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात शासकीय रुग्णालयांचे अद्ययावतीकरण करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत सांगितले.

सदस्य अमिन पटेल यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान मुंबईतील शासकीय रुग्णालयातील सोयी-सुविधाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत 15 दिवसात बैठक घेण्यात येईल. या रुग्णालयातील सोयी सुविधांवर केलेल्या खर्चाचीही उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. तसेच धर्मादाय ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांसाठी जी नियमावली तयार करण्यात आली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी होते की नाही, हे तपासण्यासाठी मोहीम हाती घेण्यात येईल. ग्रामीण भागातून मुंबईमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांची राहण्याची समस्या सोडवण्यासाठीही सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत ॲड.आशिष शेलार, मनीषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ई-रिक्षावरुन खाली पडल्याने चार वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू

Fri Aug 4 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बकरा कमेला कादर झेंडा चौकात शेजारच्या घरी आलेल्या नविन ई रिक्षात फिरायला गेलेली चार वर्षोय बालिका खाली पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना काल रात्री साडे नऊ दरम्यान घडली असून मृतक बालिकेचे नाव मरियम फातिमा वल्द मुशीर खान वय 4 वर्षे रा बकरा कमेला, कादर झेंडा कामठी असे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!