पोरवाल महाविद्यालयाचे बारावी परीक्षेतील सुयश..


संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

कामठी – मंगळवारला जाहीर झालेल्या वर्ग बारावीच्या निकालात सेठ केसरीमल पोरवाल कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी उत्तम निकालाची परंपरा कायम ठेवत सुयश मिळविले आहे. विज्ञान शाखेत एकूण ३५९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्या पैकी ३३२विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विज्ञान विभागाचा निकाल९२.७३टक्के,वाणिज्य विभागात ३२७ पैकी २४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या शाखेचा निकाल ७६.८९ टक्के तर कला शाखेचा निकाल ४२.५९ टक्के लागला.कला शाखेत १७४ विद्यार्थ्यां पैकी ६ ९विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विज्ञान शाखेतून सिद्दीकी अब्दुल रहमान अनिस अहमद सर्वप्रथम आला असून त्याला ९३.०० टकके,तर द्वितीय कुमारी वैभवी विजय अग्निहोत्री ८७.६७टक्के तर,बिस्मा महरीन मोहोम्मद हिला ८६.५० टक्के गुण मिळाले . वाणिज्य शाखेचा निकाल ७६.५४ टक्के निकाल लागला असून वाणिज्य शाखेतून कुमारी आईमन फातेमा तारिक परविज हिला सर्वाधिक ९३%गुण मिळाले.तर शुक्ला आदित्य महादेव याला ९२.६७ टक्के तर कुमारी मोहिनी संतोष.गुप्ता ९२.३३ टक्के मिळणून तृतीय क्रमांक पटकाविला.कला शाखेत मुलींनी बाजी मारली असून कला शाखेतून कुमारी वेदिका अरुण खनगर ही सर्वप्रथम आली असून तिला ६५.६७ टक्के गुण मिळाले तर द्वितीय क्रमांक कुमारी निधी दिनेश साहू हिने पटकाविला असून तिला ६४.५०.% मिळाले तर कुमारी निर्जला अजय गजबे हिला ६१.६७% गुण मिळाले आहेत.ला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय चव्हान,उपप्राचार्य प्रा डॉ सुधीर अग्रवाल व पर्यवेक्षक व्हि बी वंजारी यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शहरी जैवविविधता निर्देशांक निर्मितीची सुरुवात नागपूर पासून व्हावी - शैलेश टेंभुर्णीकर

Wed May 22 , 2024
Ø जैवविविधतेवर राज्यस्तरीय कार्यशाळा  नागपूर :- जैवविविधतेचे केंद्र म्हणून नागपुरची ओळख असून शहारातील जैवविविधता संवर्धन व संरक्षणासाठी महानगर पालिकेने जैवविविधता निर्देशांक तयार करून राज्यातील या उपक्रमाची सुरुवात करावी, अशी सूचना आज प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांनी केली. तसेच, नागपूर जिल्ह्यातील विविध तलाव चिन्हीत करून जैवविविधता संवर्धनाच्या दिशेने कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com