नवी मुंबई :- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने एकात्मिक बालविकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य अंतर्गत पोषण भी पढाई भी” हा केंद्रपुरस्कृत कार्यक्रम निपसिडमार्फत राबविण्यात येत आहे. बालकांचे पोषणासह अंगणवाडीतील पूर्व शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे या उद्देशाने 10 मे 2023 या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
“पोषण भी पढाई भी” अंतर्गत अंगणवाडीतील बालकांना उत्तम दर्जेदार पूर्व शालेय शिक्षण देण्याकरिता व अंगणवाडी केंद्र हे एक अध्ययन केंद्र/शिकण्याचे केंद्र (Learning Center) व्हावे याकरिता अंगणवाडी कार्यकर्ती-अधिकारी कर्मचारी यांचे क्षमतावर्धन करण्यात येत आहे. याअंतर्गत ० ते ३ वर्षे वयोगटाकरिता नवचेतना व ३ ते ६ वर्षे वयोगटाकरिता आधारशीला या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना देण्यात येत आहे.
आधारशीला या अभ्यासक्रमात मुलांच्या शारिरीक व कारक, बौध्दिक, भाषा विकास, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान, सामाजिक-भावनिक विकासासाठी विविध कृती समाविष्ट करण्यात आल्या आहेत. तसेच नवचेतना या अभ्यासक्रमात बालकाच्या बौदिधक विकास, पंचज्ञानेंद्रियांच्या विकासासाठी उद्दिपनाच्या कृतीवर भर दिला आहे. बालकाच्या मेंदूचा ८०% विकास ते ६ वर्षे वयोगटात होत असतो. वास्तव अंगणवाडी केंद्रामध्ये बालकांना खेळ आधारित कृतीयुक्त, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यात येत असून औपचारिक शाळेसाठी पूर्वतयारी करण्यात येत आहे.
याअंतर्गत आतापर्यंत राज्यातील १८८६ पर्यवेक्षिका/मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचे SLMT-राज्य स्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. सदर SLMT प्रशिक्षक अंगणवाडी सेविका यांना प्रशिक्षण देणार आहेत. त्याअनुषंगाने १५ जिल्ह्यातील ३७००० अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण माहे नोव्हेंबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.२५ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत अमरावती, जळगाव, गडचिरोली व अहिल्यानगर या ४ जिल्ह्या मध्ये ३१ बॅच मध्ये ३१०० अंगणवाडी सेविका यांना सदर प्रशिक्षण देण्यात येत आहे.