वेटलिफ्टिंग स्पर्धेत आहाना कपुरियाला सुवर्णपदक , नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

नागपूर :- वेटलिफ्टिंग फेडरेशन महाराष्ट्रतर्फे नुकत्याच आयोजित महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 160 किलो वजनी गटात १७ वर्ष वयोगटात आहाना प्रवीण कपुरिया हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्या या कामगिरीवर सर्व स्‍तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डिसेंबर अखेरीस आणि जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली आहे.

आहाना ही आरटीओ अधिकारी प्रवीण कपुरिया व नीलिमा कपुरिया (उद्योजिका) यांची मुलगी आहे. सेंटर पॉइंट स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या आहाना प्रवीण कपुरिया हिने काही दिवसांपूर्वी नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये झालेल्या डिएसओ स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यात तिला सुवर्णपदक मिळाले होते. याशिवाय 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती खेळणार आहे. तिने आपल्या आभ्यासात तरुणांसाठी राष्ट्रीय विक्रम स्थापित केले असून, यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे तिचे स्वप्न आहे. तिच्या यशस्वी कामगिरीसाठी सेंटर पॉइंट स्कूल व्यवस्थापन आणि शिक्षकांनी सहकार्य केले. गेल्या वर्षभरापासून संतोष सिंहासने आणि विशाल लक्ष्मण बायकुडे यांनी तिला प्रशिक्षण दिले आणि उत्कृष्ठ सराव करून घेतला. अधिकाधिक तरुणांनी खेळात पुढे यावे, अशी इच्छा आहाना प्रवीण कपुरिया हिने व्यक्त केली आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आहाना कपूरिया ने वेटलिफ्टिंग प्रतियोगिता में जीता स्वर्ण पदक, नागरकोइल में होने वाली राष्ट्रीय प्रतियोगिता के लिए चयन

Wed Nov 30 , 2022
नागपुर, ता. ३० : वेटलिफ्टिंग फेडरेशन महाराष्ट्र द्वारा हाल ही में आयोजित महाराष्ट्र भारोत्तोलन प्रतियोगिता में कुल 160 किलोग्राम भार और 17 वर्ष आयु वर्ग में आहाना प्रवीण कपूरिया ने स्वर्ण पदक जीता। आहाना के इस प्रदर्शन की हर स्तर पर प्रशंसा की जा रही है। इसके साथ ही दिसंबर के अंत और जनवरी 2023 के पहले सप्ताह के बीच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com