गुणवंतांचा गौरव, गितगायनाची रंगली मैफील, व्हॉईस ऑफ मिडीयाचा जिल्हास्तरीय कौटूंबिक स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

नंदुरबार :- जिल्हा व्हाईस ऑफ मिडीया व साप्ताहिक विंगच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्याभरातील व्हॉईस ऑफ मिडीयाच्या पदाधिकार्‍यांचा जिल्हास्तरीय कौटूंबिक स्नेह मेळावा खेळीमेळीत व गीत गायनाच्या रंगलेल्या मैफीलीत उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकारांच्या पत्नींनी आपला परिचय देत पतीच्या पत्रकारितेच्या कामकाजाचे अनुभव कथन केले. पाल्यांनीही नृत्य सादर केले तर पत्रकारांनी आपल्यातील गीतगायनाची कला विविध गाणे म्हणुन सादर केली. या मेळाव्यात परिक्षांसह विविध क्षेत्रात यश संपादन करणार्‍या पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमातून पत्रकारांच्या कुटूंबियांचा स्नेहसंवाद साधण्यात आला.व्हॉईस ऑफ मिडीया ही संघटना पत्रकारिता आणि पत्रकारांच्या कल्याणासाठी काम करणारी संघटना आहे. नंदुरबार जिल्हा व्हॉईस ऑफ मिडीया व साप्ताहिक विंग यांच्या संयुक्त विद्यमाने या संघटनेचा नंदुरबार जिल्ह्यातील पत्रकारांच्या कुटूंबियांसाठीचा पहिलाच जिल्हास्तरीय कौटूंबिक स्नेहमेळावा दि.2 जुलै 2023 रोजी नंदुरबार येथील व्ही.जी.राजपूत लॉन्समध्ये घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र दोरकर होते. व्यासपीठावर व्हॉईस ऑफ मिडीया साप्ताहिंग विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष राजू पाटील, साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष सुभाष कुंभार, व्हॉईस ऑफ मिडीयाचे कार्याध्यक्ष धनराज माळी, सरचिटणीस राकेश कलाल, उपाध्यक्ष बाबासाहेब राजपूत, शहादा तालुकाध्यक्ष रुपेश जाधव, नवापूर तालुकाध्यक्ष प्रा.डॉ.आय.जी.पठाण उपस्थित होते. या मेळाव्याची सुरुवात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. संघटनेचे दिवंगत पदाधिकारी रविंद्र वेडू चव्हाण यांना सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष धनराज माळी यांनी प्रास्ताविकातून व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेच्या कार्याची माहिती दिली. तसेच ही संघटना पत्रकार व त्यांच्या कुटूंबियांच्या हितासाठी काम करणारी संघटना असून त्याचाच एक भाग म्हणून व्हॉईस ऑफ मिडीयाचा नंदुरबार जिल्ह्यात पहिलाच कौटूंबिक स्नेह मेळावा होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विविध क्षेत्रात व परीक्षांमध्ये यश संपादन करणार्‍या पत्रकारांच्या पाल्यांचा गौरव करण्यात आला. यात राजवीर विनोद बोरसे, नैना रोहित निकम, उन्नती राकेश कलाल, हर्षदा धनराज माळी, कल्पेश वसंत मराठे, लिना महादु हिरणवाळे, तेजस राजेश कर्णकार या विद्यार्थ्यांचा गौरव तर समतारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल बाबासाहेब राजपूत यांचा तर जिल्हा माहिती कार्यालयाचे सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण कुलथे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांनी आपला परिचय देवून आपल्या पतीच्या पत्रकारितेच्या कामकाजाविषयी अनुभव सांगितला.अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी सांगितले की, पत्रकार हा नेहमी अनेकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम आपल्या लेखणीतून करीत असतो. म्हणून बातमी संकलनामुळे पत्रकार हा आपल्या कुटूंबियांना पाहिजे तसा वेळ देत नाही अशी अनेक पत्रकारांच्या पत्नीची तक्रार असते. म्हणूनच व्हॉईस ऑफ मिडीयातर्फे पत्रकारांच्या कुटूंबियांचा स्नेह मेळावा असल्याने यातून पत्रकारांच्या पत्नींची एकमेकांशी ओळख होईल व त्यात महिलांचा खर्‍या अर्थाने सुसंवाद घडले, असाच उद्देश या मेळाव्याचा असल्याचे योगेंद्र दोरकर यांनी सांगितले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गार्गी बाबासाहेब राजपूत हिने गुरुपौर्णिमेवर आधारित जीवनातील गुरुंचे महत्त्व यावर वक्तृत्व सादर करुन केली. नंदिनी अरुण मोरे या बालिकेने नृत्य सादर करीत लक्ष वेधून घेतले. तसेच विजय बागुल यांनी कविता वाचन केली. हेमंत जाधव, राकेश कलाल, धनराज माळी, योगेंद्र दोरकर, फुंदीलाल माळी, जगदिश ठाकूर यांनी विविध गीत सादर केले. तर गणेश वडनेरे व ज्योती गणेश वडनेरे या दांम्पत्याने सामुहिक गाणे सादर करीत उपस्थितांची मने जिंकून घेतली. योगिता वैभव करंवदकर यांनी सादर केलेल्या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या स्नेह मेळाव्याला नंदुरबारसह नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील पत्रकारांसह त्यांचे कुटूंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक फुंदीलाल माळी यांनी केले. आभार साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्याध्यक्ष राजू पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नंदुरबार जिल्हा व्हाईस ऑफ मिडीया व साप्ताहिक विंगच्या पदाधिकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोराडी मंदिर परिसर : अब सीमेंट रोड पर डामरीकरण

Mon Jul 3 , 2023
– सड़क निर्माण में भ्रष्टाचार रोकने के लिए केंद्रीय सड़क परिवहन मंत्री नितिन गडकरी ने डामर की सड़क की बजाय सीमेंट सड़क निर्माण पर बल दिया,उसी को धता बताकर कोराडी मंदिर परिसर में सीमेंट सड़क पर डामर की चादर बिछाई जा रही है। नागपुर/कोराडी :- कोराडी मंदिर परिसर में जल्द ही महामहिम का आगमन होने वाला है,उनके आवाजाही मार्ग पर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com